ब्रेकिंग : SBI कडून निवडणूक रोख्यांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला सादर; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कारवाई

ब्रेकिंग : SBI कडून निवडणूक रोख्यांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला सादर; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टेट बँक इंडियाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांचे नंबरही आज (गुरुवार) निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. (Electoral Bond)

प्रतिज्ञापत्रात स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, "इलेक्ट्रोल बाँडच्या अल्फान्युमरिक नंबरसह संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले गेले असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने फक्त निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती, आणि संस्था यांची माहिती एका पीडीएफमध्ये तर कोणत्या पक्षांनी हे रोख वठवले यांची माहिती दुसऱ्या पीडीएफमध्ये अशा प्रकारे ही माहिती दिली होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांबद्दलची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर केली आहे, यामध्ये रोख्यांच्या युनिक नंबरचाही समावेश आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (Electoral Bond)

निवडणूक आयोगला सादर केलेली माहिती | Electoral Bond

बाँड घेणाऱ्यांबदल्लची माहिती – सिरीयल नंबर, युआरएन नंबर, जर्नल डेट, डेट ऑफ पर्चेस, डेट ऑफ एक्सपायरी, नेम ऑफ पर्चेसर, बाँड क्रमांक, रक्कम, ब्रँच कोड इत्यादी.

बाँड वठवणाऱ्यांची माहिती – सीरियल नंबर, वठवल्याची तारीख, पक्षाचे नाव, खाते क्रमांकाची शेवटीचे चार नंबर, बाँडचा क्रमांक, रक्कम, ब्रँच

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news