SBI Home Loan : ‘एसबीआय’ गृहकर्ज व्याजदरात वाढ

SBI
SBI

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या रेपो दरात अर्ध्या टक्क्याने वाढ केल्‍याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या कजार्जाच्‍या व्‍याजदरात वाढ केली आहे.  RBI चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून ही वाढ  (SBI Home Loan) करण्यात आली आहे.

चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो ०.५ टक्क्यांनी वाढवून ५.९ टक्के केला आहे.  ही वाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल. नवीन दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या गृहकर्जावर होणार आहे. होम लोनच्या हप्त्यावरील व्याज दर (SBI Home Loan) वाढणार आहे.

 गृहकर्जाचा व्याजदर वाढीपूर्वी 8/05 टक्के असल्यास, नवीन दर 8.55 टक्के असेल. तथापि, PSB तारणावर आकारला जाणारा व्याजदर ठरवताना कर्जदाराचे प्रोफाइल, कर्ज ते मूल्य प्रमाण, जोखीम मूल्यांकन, चुकलेली पेमेंट आदीसह अनेक चलने विचारात घेतील जातील.

दरम्यान, कर्जदाराने कर्जाची मुदत वाढवण्याची निवड केली, तरच उच्च EMI खर्च कमी केला जाऊ शकतो. तथापि, हा पर्याय निवडल्याने कर्जाचे व्याजदर जास्त होतील. किंवा, कर्जदाराने कर्जाच्या शिल्लक रकमेचा काही भाग प्रीपेमेंट केल्यास, यामुळे कर्जाची उर्वरित शिल्लक कमी होईल आणि सुधारित परंतु कमी केलेला व्याज दर लागू होईल.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news