SBI च्या कर्जधारकांना मोठा झटका! व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवे दर

SBI
SBI

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) ७० बेसिस पॉइंट्स (bps) म्हणजेच ०.७ टक्क्यांनी वाढवून १४.८५ टक्के करणार आहे. सध्याचा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट १४.१५ टक्के आहे. तसेच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक बँक असलेली एसबीआय बेस रेट ७० बेसिस पॉइंट्सने वाढवणार आहे. यामुळे बेस रेट सध्याच्या ९.४० टक्क्यांवरून १०.१० टक्क्यांपर्यंत वाढेल. ही व्याजदरवाढ १५ मार्चपासून लागू होणार आहे. बीपीएलआर हा बँका आकारत असलेला व्याजदर असतो. याआधी SBI ने १५ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचा बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट तसेच बेस रेटमध्ये बदल केला होता.

दरम्यान, SBI ने निधी-आधारित कर्ज व्याजदराच्या किरकोळ दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ गृहकर्जाच्या व्याजदरावर याचा परिणाम होणार नाही. MCLR म्हणजे बँक ज्या व्याजदराने ग्राहकांना कर्ज देते.

SBI ने १५ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडक मुदतीवरील कर्जदरात (MCLR) १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१ टक्क्यांनी अखेरची वाढ केली होती. एक वर्षाच्या कर्जासाठी, दोन वर्षांच्या कर्जासाठी आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी MCLR दर अनुक्रमे ८.५० टक्के, ८.६० टक्के आणि ८.७० टक्के एवढा आहे. रिझर्व्ह बँकेने ८ फेब्रुवारी रोजी महागाईला तोंड देण्यासाठी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्स वाढ करून तो ६.५० टक्क्यांपर्यंत नेल्यानंतर एसबीआयने व्याजदरात वाढ केली होती.

आरबीआयने देशात एमसीएलआर प्रणालीची २०१६ मध्ये सुरूवात केली होती. हा बँकेचा एक बेंचमार्क म्हणून ओळखला जातो. एमसीएलआर प्रणालीनुसार कर्ज देताना किमान व्याजदर निश्चित केला जातो. जर का एमसीएलआर वाढला तर त्याचा फटका ग्राहकांना बसतो. परिणामी कर्जाचा मासिक हप्ता वाढतो.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news