‘भगवा जेएनयू’ म्हणत आणि भगवे झेंडे लावत हिंदूसेनेकडून जेएनयूत बॅनरबाजी

JNU www.pudharinews
JNU www.pudharinews

पुढारी ऑनलाईन डेस्क : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या बाहेर हिंदूसेनेकडून भगवे झेंडे आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. भगवा जेएनयू असे म्हणत जेएनयू बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे झेंडे आणि पोस्टर जेएनयूच्या बाहेरील रोडवर आणि मुख्य गेटवर लावण्यात आले आहेत. रामनवमी दिवशी डाव्या विचारांच्या आणि एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांमध्ये हिंसा झाली होती. या हिंसेत काही विद्यार्थी जखमी झाले होते. या हिंसेनंतर जेएनयूच्या बाहेर ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हिंदूसेनेचे उपाध्यक्ष सुरजीत यादव म्हणाले आहेत की, भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमच्या बरोबरच प्रत्येक धर्माचाही आदर करतो. भगव्याचा अपमान केला जात आहे हे हिंदूसेना सहन करणार नाही. हिंदूसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आल्यानंतर दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी यांनी म्हटले आहे की, सकाळी आम्हाला या  पोस्टरबाजी बद्दल माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर हे पोस्टर लगेच हटवण्यात आले आहेत. यावर कारवाई केली जाईल.

रामनवमी दिवशी कावेरी हॉस्टेलमध्ये नॉनव्हेज खाण्यावरून ही हिंसा झाली होती. नॉनव्हेज वाढताना एबीव्हिपीच्या विद्यार्थ्यांनी थांबवले आणि हिंसा केल्याचा आरोप डाव्या विचारांच्या विद्यार्थांनी आरोप केला आहे. तर एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांवर आरोप केला आहे की, त्यांनी पुजा थांबवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news