शेजाऱ्यांशी बोला आणि निरोगी राहा; शेजाऱ्यांशी बोलणं हितकारक – संशोधनातील निष्कर्ष

शेजाऱ्यांशी बोला आणि निरोगी राहा; शेजाऱ्यांशी बोलणं हितकारक – संशोधनातील निष्कर्ष
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या धावपळीच्या जीवनात घरातील लोकांशाही संवाद हरपत चालला आहे. शेजाऱ्यांशी असणारा संवादही बंद होत चालला आहे. पण शेजऱ्यांशी, आपल्या परिसरातील लोकांशी बोललण्याने आरोग्य चांगले राहते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. (Saying Hello Linked to Higher Wellbeing)

Gallup या संस्थेने हा सर्व्हे घेतला होता. ज्यांना कुणी शेजारी नाही, किंवा जे एकाही शेजाऱ्याला हॅलो म्हणत नाहीत, त्यांचा वेलबिईंग स्कोअर ५१.५ इतका होता, तर जे लोक किमान ६ शेजाऱ्यांना हॅलो म्हणतात त्यांच्या वेल बिईंग स्कोअर ६४.१ इतका होता, असे या पाहाणीतून दिसून आले आहे.

Gallup National Health and Well-Being Index साठी हा सर्व्हे घेण्यात आला होता. शून्य ते १०० या स्कोअरमध्ये हा सर्व्हे विभागण्यात आला आहे. ३० मे ते ६ जून या कालावधित अमेरिकेतील ४५५६ इतक्या लोकांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला.
स्वास्थ्य या व्याख्येत शारीरिक आरोग्य या जोडीने करिअर, आर्थिक, सामाजिक, समुदाय अशा पाच गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. या पाचही बाबींत शेजाऱ्यांना नियमित हॅलो म्हणणाऱ्यांना जास्त स्कोअर मिळाला आहे.

संशोधनात म्हटले आहे की, "लोकांच्या निरोगी जीवनात इतरही बऱ्याच गोष्टींचा समावेश असू शकतो. उदाहरणात जर तुम्ही अधिक श्रीमंत असाल तर समुदायाच्या पातळीवर अधिक सुरक्षित वातावरण मिळू शकते. या संदर्भात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. भविष्यातील संशोधनासाठी ही एक प्रकारे दिशा आहे."

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news