खिशात फक्त 50 रुपये अन् सायकलवर प्रवास करून हिमालयास सलाम !

खिशात फक्त 50 रुपये अन् सायकलवर प्रवास करून हिमालयास सलाम !

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : एखादी गोष्ट करण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अशीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे सुपा (बारामती) येथील विलास वाकचौरे या तरुणाने. 81 दिवसात पाच हजार 600 किलोमीटरचा प्रवास करून चारधाम यात्रेसह नेपाळ येथील पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन तो परतला आहे. विलास वाकचौरे हा सायकलस्वार परतीच्या प्रवासादरम्यान श्रीगोंदा येथे आला होता. यावेळी श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. विलास वाकचौरे म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन बारामती ते केदारनाथ, पशुपतीनाथ (नेपाळ) असा प्रवास पूर्ण केला. पुढील वर्षी एव्हरेस्ट शिखर सर करणार आहे.

या प्रवासात माझेकडे फक्त 50 रुपये होते; मित्र ठामपणे मागे उभे राहिले. भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याचे सायकल प्रवासादरम्यान ठिकठिकाणी स्वागतावेळी जाणवत होते. नेपाळ सारख्या देशात आपले तिथे कुणी नाही हा विचार सुरू असताना विटा, फलटणचे सोन्यावर नक्षीकाम करणारे कारागिर भेटले. त्यांनी खुप मदत केली. बद्रीनाथ प्रवासादरम्यान सायकलचे ब्रेक निकामी झाले. तीव्र उतार असल्याने सायकल थांबता थांबत नव्हती. परंतु, प्रसंगावधान राखून सायकल दगडावर धडकवली. त्यात खांद्याला मार लागला. प्रवासात जसे चांगले अनुभव आले, तसे वाईट ही अनुभव आले.

श्रीगोंदा येथे शरद जमदाडे, नवनाथ दरेकर, शिवप्रसाद उबाळे, राजकिशोरी लांडगे, अमोल गव्हाणे, महारुद्र तांबे, मच्छिंद्र लोखंडे, गणेश श्रीराम, अ‍ॅड. संपत इधाटे, शुभम गांजुरे, सुरेश खामकर, विशाल दंडनाईक, शिवाजी शिंदे, उमेश राऊत, माऊली उबाळे यांनी शुभेच्छा दिल्या. मिठू लंके यांनी प्रास्ताविक केेले. बाळासाहेब काकडे यांनी आभार मानले. तरुणांनो व्यसनापासून दूर रहा असे विलास वाकचौरे म्हणला, 'मित्राचा फोन आला अन् वाचलो' बद्रिनाथ येथे जाताना एका मित्राचा फोन आला. मी फोन घेण्यास उभा राहिलो. त्याचवेळी काही फूट अंतरावर दरडीचा मोठा दगड पडला. मृत्यू काय असतो हे साक्षात अनुभले. मित्राच्या फोनमुळे वाचलो… ह प्रसंग ऐकताना अंगावर शहारे आले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news