‘सावली होईन सुखाची’ फेम गौरीचा ग्लॅमरस अंदाज पाहिला का?

seema kulkarni
seema kulkarni
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री सीमा कुलकर्णीने मराठीतचं नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चमक दाखवलीय. तिने मॉडेलिंगगदेखील केले आहे. थिएटर आर्टिस्ट म्हणून तिने काम केले आहे. तिने अनेक फिचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि नाटकांमध्ये काम केली आहेत. सध्या तिची सन मराठीवरील मालिका सावली होईन सुखाची चर्चेत आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत असून गौरी हे पात्र साकारत आहे.

संबंधित बातम्या-

प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. 'सन मराठी' वाहिनी 'सावली होईन सुखाची' ही नवीन मालिका घेऊन आली आहे , ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे. त्याच्यामुळे घरात सकारात्मक वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभावदेखील वावरतोय. कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे. त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.

रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित 'सावली होईन सुखाची' या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिली आहेत. विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news