Pune University : पुणे विद्यापीठात मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून पैशांची मागणी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Pune University : पुणे विद्यापीठात मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून पैशांची मागणी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचारी मार्कशिट व इतर कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यापीठातील कर्मचारी संबंधित विद्यार्थ्यानेच मला पैसे दिले, अशी कबुलीही देत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधून उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात यावे लागते. परंतु, परीक्षा विभागातील काही कर्मचारी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता.

एका विद्यार्थ्याने तर माझ्याकडून कागदपत्रांसाठी पैसे मागितले असल्याची लेखी तक्रार स्टॅम्पपेपरवर लिहून दिली होती. परंतु, संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. आता एका कर्मचार्‍याला मार्कशिटसाठी तीन हजार रुपये घेताना विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच पकडून दिले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून परीक्षा विभागातील कर्मचारी पैसे घेत असल्याचा पुरावाच तयार केला आहे. बीएचे शिक्षण घेतलेल्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याकडून नेवासे नावाच्या कर्मचार्‍याने पैसे घेतल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसून येत आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधित विद्यार्थ्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यास पोलिसांच्या कारवाईनंतर संबंधित कर्मचार्‍यास निलंबित करण्यात येईल.

डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news