PM Narendra Modi : ‘कुटुंब वाचवा, कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवा’; पंतप्रधानांची विरोधकांवर टीका

PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन केले. या टर्मिनलची सध्याची दररोजची क्षमता ४,००० पर्यटकांना हाताळण्याची आहे, तर या एकात्मिक टर्मिनलनंतर कार्यान्वित होणारी नवीन क्षमता दररोज ११,००० पर्यटकांना हाताळण्याची असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्घटनादरम्यान,"काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे विकासाचे फायदे देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचले नाहीत." असं म्हणत विरोधी पक्षांवर निशाणा साधला. (PM Narendra Modi )

PM Narendra Modi : काय म्हणाले पंतप्रधान…

पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पोर्ट ब्लेअरच्या या नवीन टर्मिनल इमारतीमुळे प्रवास सुलभता वाढेल, व्यवसाय करणे सुलभ होईल आणि कनेक्टिव्हिटीही चांगली होईल. विरोधी पक्ष केवळ त्या कामांना प्राधान्य देतात ज्यामध्ये स्वतःचे आणि कुटुंबाचे भले असते. त्याचा परिणाम असा झाला की, आपल्या आदिवासी भागातील व बेटांतील लोक विकासापासून वंचित राहिले, विकासासाठी तळमळत राहिले.

विरोधकांवर टिका करताना ते म्हणाले," बराच काळ भारतातील विकासाची व्याप्ती काही मोठी शहरे आणि काही प्रदेशांपुरती मर्यादित होती. काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे विकासाचे फायदे देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचलेले नाहीत. आमच्या आधीच्या सरकारच्या ९ वर्षात अंदमान आणि निकोबारला सुमारे २३,००० कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले होते. आमच्या सरकारच्या काळात ९ वर्षात अंदमान निकोबारच्या विकासासाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये अंदमान निकोबारमधील सुमारे २८ हजार घरांना पाण्याची जोडणी देण्यात आली होती. आमच्या सरकारमध्ये येथील सुमारे ५० हजार घरांना पाण्याची जोडणी देण्यात आली आहे.

आपले कुटुंब वाचवा, कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवा

माझे भाग्य आहे की २०१८ साली मी अंदमानमध्ये ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ध्वज फडकावला होता त्याच ठिकाणी मी तिरंगा फडकवला. आमच्या सरकारनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून रॉस आयलंडचे नाव दिले,  हॅवलॉक आणि नील बेटांना स्वराज आणि शहीद बेट अशी नावे दिली आहेत. भ्रष्ट आणि घराणेशाही पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या क्षमतेवर अन्याय केला. आज देशातील जनतेने २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपले सरकार आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेले काही लोक आपली दुकाने उघडून बसले आहेत. या लोकांना देशाची लोकशाही आणि संविधान ओलिस बनवायचे आहे. अनेक दशकांपासून देश कुटुंबवादाच्या आगीत होरपळत आहे. देशातील गरिबांच्या मुलांचा विकास नाही, तर त्याच्या स्वत:च्या मुलांचा आणि भाऊ-पुतण्यांचा विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांची एकच विचारधारा आणि अजेंडा आहे. आपले कुटुंब वाचवा, कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवा. त्यांच्या कुटुंबात जमलेला हा गट, मोठमोठे घोटाळे आणि गुन्ह्यांवर त्यांची जीभ बंद आहे.

बदलाच्या गप्पा मारून, जनतेची फसवणूक 

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "कोणत्याही एका राज्यातील त्यांचे कुशासन उघड झाले की, लगेच दुसऱ्या राज्यातील हे लोक त्यांच्या बचावात युक्तिवाद करू लागतात. कुठेतरी पूर घोटाळा होतो, कुणाचे अपहरण होते, मग सर्व लोक गप्प होतात. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत उघड हिंसाचार झाला होता. सतत रक्तपात होत आहे, यावरही सर्वजण गप्प आहेत. काँग्रेस आणि डाव्यांचेच कार्यकर्ते स्वत:ला वाचवण्यासाठी तिथे विनवणी करत आहेत.

बदलाच्या गप्पा मारून जनतेची फसवणूक करून, कोट्यवधींचा दारू घोटाळा करून ही घराणे पुन्हा त्यांना कवच देऊ लागली आहेत. तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत, परंतु त्यांच्या घराण्यातील सर्व पक्षांनी याआधीच सर्वांना क्लीन चिट दिली आहे. या लोकांच्या कारस्थानांमध्ये देशाच्या विकासासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news