सातारा : फरासवाडीत खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

सातारा : फरासवाडीत खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

सातारा : पुढारी वृत्तसेवा : धारदार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री फरासवाडी (ता. सातारा) येथे उशिरा उघडकीस आली. फिरोझ चांद मुलाणी (वय ३७, सध्या रा. फरासवाडी-कोंडवे, ता. सातारा, मूळ रा. कडेगांव, जि. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, ही घटना मंगळवारी रात्री घडली असून रात्री उशिरा समोर आली आहे. फिरोझ हे सासरवाडीमध्ये कुटुंबासोबत राहत आहेत. काल रात्री त्यांच्या भावाला फिरोझ यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रूग्णालयामध्ये नेण्यात आला.

दरम्यान, फिरोझ यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला आहे. काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news