सातारा : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला

सातारा : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाचा हल्ला
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : दरोड्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या पथकावर कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोडही केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी सायंकाळी एका युवकास दुचाकीवरून आलेल्या काही युवकांनी मारहाण करत त्याच्याकडील रोख रकमेसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यातील संशयित आरोपी कराड तालुक्यातील हरपळवाडीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यांना पकडण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील ढाणे, कर्मचारी व होमगार्ड गेले असता संशयिताने गावातील ग्रामस्थांना बोलावून पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांच्या गाडीचीही मोडतोड जमावाने केली. या स्थितीतही बोरगाव पोलिसांनी योगेश बाळू संकपाळ, उद्धव शिवाजी काळभोर, शहाजी खंडेराव काळभोर व अमोल बाळासो पवार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात या चौघांसह अज्ञात १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news