संजय राऊत यांचा सोमय्यांवर आणखी एक आरोप; म्हणाले, “किरीट का कमाल…”

संजय राऊत यांचा सोमय्यांवर आणखी एक आरोप; म्हणाले, “किरीट का कमाल…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : "एनसएसईएलच्या ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी 'ईडी'ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले", असा आरोप संजय राऊत यांनी आज केला.

 राऊत यांनी किरीट सोमय्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहेत. ट्विटरवरुनही यासंदर्भात पोस्ट शेअर करताना त्यांनी 'किरीट का कमाल' नावाखाली राऊतींना सोमय्यांवर विविध आरोप केले आहेत. मंगळवारी सकाळीदेखील आरोप करताना राऊत म्हणाले होते की, "पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी  आहे. त्या डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत गैरव्यवहार झाले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? असा सवाल करत अशा एकूण १७२ कंपन्या असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला हाेता.

किरीट सोमय्या सतत इतरांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत असतात. धमक्या देत असतात. त्यांचं युवक प्रतिष्ठान आहे, त्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये संशयास्पद देणग्या कशा येतात? देणगीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जाते. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय चौकशी आहे. कंपन्यांवर धाडी पडणार आहे किंवा पडताहेत, अशा कंपन्यांकडून हे महाशय देणग्या उचलताहेत, असा आराेपही त्‍यांनी केला.
ईडी आणि सीबीआयच्या कामाची पद्धत सध्या अशी आहे की, एखाद्या मोठ्या कंपनीवर गैरव्यवहारासंबंधी धाड पडली. तर ज्या लोकांना या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ झाला आहे. त्यांची सुद्धा चौकशी होते, किंवा त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं प्रकरण असंच आहे. आमचीही अशीच चौकशी झालेली आहे, असेही राऊत यावेळी म्‍हणाले.
हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news