सांगली : अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक

सांगली : अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक
Published on
Updated on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : येथील माधवनगर – मिरज रस्त्यावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचेअनावरण करण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा रोखला. परंतु पोलिसांना चकवा देत ड्रोनच्या सहाय्याने अनावरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु ड्रोन पडल्याने हा प्रयत्न फसल्याचे समजते. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केले ड्रोन जप्त

पुतळा अनावरण करण्यासाठी पडळकर काही कार्यकर्त्यांसह दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  पोलिसांनी ड्रोन जप्त केले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण करण्यासाठी माधवनगर- मिरज रस्त्यावर हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आज सकाळपासून ठाण मांडले होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ढोलाचा गजर करत घोषणाबाजी करण्यात आली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे वसंतदादा सूतगिरणी चौकातून कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आत घुसले. यावेळी ड्रोनने अहिल्यादेवीच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील एकजण ड्रोनचा मालक असल्याचे समजते. झेंडे घेऊन स्मारकाकडे निघालेल्या चार-पाच कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news