Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना न्यायालयाकडून पुन्हा दिलासा; अटकेपासून अंतरिम संरक्षण २ आठवड्यांनी वाढवले

Sameer Wankhede
Sameer Wankhede

पुढारी ऑनलाईन: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज (दि.०८ जून) समीर वानखेडे यांचे अटकेपासून अंतरिम संरक्षण २ आठवड्यांनी वाढवले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा पुढील दोन आठवड्यांसाठी 23 जूनपर्यंत वाढवला आहे.

दरम्यान वानखेडे यांच्या वकिलाने हायकोर्टाला विनंती केली आहे की, त्यांना दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी द्यावी, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याविरोधात वानखेडे उच्च न्यायालयात गेले आहेत. यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता. त्यानंतर आज पुन्हा अटकेपासून त्यांना २ आठवड्यांचे संरक्षण दिले आहे.

यापूर्वी न्यायालयाने शाहरूखसोबतचे चॅट जाहीर करण्यास व माध्यमांशी न बोलण्याचे आदेश वानखेडे यांना दिले होते. दरम्यान, कुटुंबीयांना चार दिवसांपासून धमक्या येत असल्याचे कारण देत वानखेडे (Sameer Wankhede) यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे अर्ज करत, सुरक्षेची मागणी देखील केली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news