भारतीय ‘ब्रेन’ OpenAI ला देणार ‘सल्‍ला’! कंपनीने ऋषी जेटलींवर सोपवली मोठी जबाबदारी

ऋषी जेटली यांची  सॅम ऑल्‍टमन यांचे वरिष्ठ सल्लागार म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे,
ऋषी जेटली यांची  सॅम ऑल्‍टमन यांचे वरिष्ठ सल्लागार म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे,
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या  जगात क्रांती घडवणाऱ्या OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्‍टमन (Sam Altman) हे आता भारतीय ट्विटर इंडियाचे माजी प्रमुख ऋषी जेटली (Rishi Jaitly ) यांचा सल्‍ला घेणार आहेत. ऋषी जेटली यांची  सॅम ऑल्‍टमन यांचे वरिष्ठ सल्लागार म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे, असे 'टेकक्रंच'ने आपल्‍या रिपाेर्टमध्‍ये म्‍हटलं आहे. दरम्‍यान, OpenAI कंपनी किंवा ऋषी जेटली या दोघांनीही याबाबत अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.

'टेकक्रंच'ने आपल्‍या रिपोर्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "OpenAI भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे धोरण आणि नियम याबाबतची माहिती मिळविण्यासाठी ट्विटर इंडियाचे माजी प्रमुख ऋषी जेटली यांची मदत घेत आहेs. ऋषी जेटली यांची OpenAI कंपनीचे वरिष्ठ सल्लागार म्‍हणून नियुक्‍ती झाली आहे. AI धोरणांबाबत भारत सरकारशी संवाद साधण्यावर त्‍यांनी लक्ष केंद्रित केले आहे. OpenAI च्या भारतात वाटचालीत त्‍यांची भूमिका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे."

Rishi Jaitly भारतातील Twitter चे पहिले कर्मचारी

ऋषी जेटली २००७ ते २००९ या काळात भारतातील Google साठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रमुख होते. त्यानंतर, २०१२ मध्‍ये Twitter (आता X) कंपनीचे देशातील पहिले कर्मचारी असा मान मिळवला होता. त्‍यांनी २०१६ मध्‍ये ट्विटरपासून फारकत घेतली. यानंतर ते 'टाइम्स ब्रिज'चे सह-संस्थापक आणि सीईओ बनले.

ओपनएआयचे जागतिक घडामोडींचे उपाध्यक्ष अण्णा माकांजू पुढील आठवड्यात दिल्ली येथे होणाऱ्या ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GPAI) शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. यापूर्वी ऋषी जेटली यांची झालेली निवड OpenAI कंपनी भारतात गुंतवणुकीसाठी उत्‍सूक असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्‍याशी सॅम ऑल्‍टमन यांनी केली होती चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सॅम ऑल्टमन यांनी जून महिन्‍यात भेट घेतली होती. भारतातील तंत्रज्ञान विकासावर या भेटीत चर्चा झाली होती. ऑल्टमन यांनी AI मधील भारताच्या संभाव्यतेबद्दल स्‍वागत केले होते. तसेच सोशल मीडिया पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याशी झालेल्‍या उल्लेखनीय संवाद आणि भेटींचे कौतुक केले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news