सिडनी : मिठाशिवाय कोणतेही जेवण अपूर्ण असते. पदार्थाला चव येते ती या मिठामुळेच. पण, हे मीठ केव्हाही भांड्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात कधीही ठेवू नये, ते नेहमी काचेच्या भांड्यातच ठेवावे, असे सांगितले जाते आणि त्याला बरीच कारणे आहेत. (Salt)
काचेच्या भांड्यात मीठ साठवल्याने आर्थिक चणचण भासत नाही; शिवाय ज्या समस्या असतील त्या दूर होतात, असे मानले जाते. काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने सौभाग्याची प्राप्ती होते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते. इतकेच नाही, तर यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो.
काचेच्या भांड्यात मिठाची साठवणूक केल्याने आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत. घरात सुख-शांतीचा वास असतो आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारचे गृहकलह होत असतील, तर ते कमी होतात. दोष असतील, तर त्यापासून सुटका होण्यास मदत होते, असेही मानले जाते.
हेही वाचा