रजोनिवृत्तीनंतर आरोग्य समस्या : महिलांनी अशी घ्यावी काळजी? | पुढारी

रजोनिवृत्तीनंतर आरोग्य समस्या : महिलांनी अशी घ्यावी काळजी?

रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील एक असा काळ आहे ज्यात तिची मासिक पाळी थांबते आणि तिचे अंडाशय प्रजनन कार्यक्षमता गमावतात. 45-55 वयोगटातील महिलांना रजोनिवृत्ती येऊ शकते.

पेरीमेनोपॉज म्हणजे काय?

स्त्रिया 30 किंवा 40 च्या दशकात असताना पेरीमेनोपॉजचा अनुभव घेऊ शकतात. जेव्हा अंडाशय अंड्यांची निर्मिती थांबविते शिवाय हे रजोनिवृत्तीपर्यंत टिकते. मासिक पाळीतील अनियमितता तसेच शरीरातील अतिरिक्त उष्णता अशी रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू शकतात. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीच्या काळात आणि नंतर महिलांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या विक्षिप्त, उदास, तणावग्रस्त, निराश, चिंताग्रस्त दिसतात.

रजोनिवृत्तीनंतर आरोग्य समस्या : वयाच्या 55 वर्षांपूर्वी, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयरोगाची शक्यता कमी असते. त्यांच्यातील एस्ट्रोजेन शरीराला चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करते. तसेच, रक्तवाहिन्या योग्य आणि खुल्या ठेवण्यास मदत करते;

पण नंतर कोलेस्टेरॉल धमनीच्या भिंतींवर जमा होऊ शकते. ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. वयाच्या 70 व्या वर्षी स्त्रियांना हृदयरोगाचा धोका समान वयाच्या पुरुषांइतकाच असतो. रजोनिवृत्तीनंतर कमी एस्ट्रोजेन असण्याने अस्थिरोग होण्याचा धोका वाढून हाडांची खनिज घनता कमी होते.

ज्यामुळे हाडे ठिसूळ, कमकुवत होतात आणि सहज तुटतात. या स्त्रियांमध्ये लघवीची असंयमतादेखील दिसून येते. एस्ट्रोजेनची कमी पातळी एखाद्याचा मूत्रमार्ग कमकुवत करू शकते. शिवाय, स्त्रियांना मौखिक आरोग्याच्या समस्या देखील येऊ शकतात.

रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये कोरडे तोंड आणि पोकळी वाढण्याचा धोका सामान्यतः दिसून येतो. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर निरोगी राहणे अत्यावश्यक आहे. रजोनिवृत्तीनंतर फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश आणि रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील कठीण टप्प्यांपैकी एक आहे आणि प्रत्येक स्त्री या टप्प्यातून जाते. रजोनिवृत्तीच्या आधी, दरम्यान आणि नंतर आपले आरोग्य उत्तम राहणे अतिशय गरजेचे आहे. यावेळी एक निरोगी जीवनशैली स्वीकारणे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

Back to top button