drug case : आर्यनच्या अटकेनंतर सलमान शाहरुखला भेटला!

drug case : आर्यनच्या अटकेनंतर सलमान शाहरुखला भेटला!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : क्रूझवरील (Mumbai cruise drug case) रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याच्या अटकेची बातमी कळताच शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर अभिनेता सलमान खानने धाव घेतली. सलमान काल रविवारी रात्री सुमारे ११.३० वाजता शाहरुखच्या बंगल्याबाहेर स्पॉट झाला. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सलमान आपल्या कारमधून शाहरुखच्या घरी जाताना दिसत आहे. शाहरुखच्या बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच दरम्यान सलमानने आपली कार शाहरुखच्या बंगल्याच्या गेटमधून आत नेली.

सलमान आणि शाहरुख यांची जुनी मैत्री आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुखचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर सलमान शाहरुखच्या भेटीसाठी त्याच्या मन्नत बंगल्यावर पोहोचल्याचे समजते. सलमान रात्री उशिरापर्यंत शाहरुखच्या बंगल्यावर होता. त्यानंतर रात्री उशिरा तो बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईम जवळ शनिवारी रात्री भरसमुद्रात 'कॉर्डेलिया द एम्प्रेस' या आलिशान क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकून रेव्ह पार्टी उधळली आणि ८ जणांची धरपकड केली. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना अटक करण्यात आली.

आर्यन खान सध्या कोठडीत आहे. एनसीबीने या कारवाईत (Mumbai cruise drug case) मुनमुन धमीचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट आणि शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. एनडीपीए कायद्यातील कलम २७ (ए) अन्वये आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट (१९८५) हा अमली पदार्थांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी केलेला कडक कायदा आहे. या कायद्यातील कलम २७ अनुसार अमली पदार्थांचे सेवन करणे हा दंडनीय गुन्हा ठरवण्यात आला असून, त्याबद्दल एक वर्षाची कैद किंवा २० हजार रुपये दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद उपकलम (ए) अंतर्गत करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ : जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं.. | Swami Motors |Pre-owned Cars

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news