सलमान खानचे ‘आयफा’मध्ये ‘त्‍या’ आठवणींने डोळे पानावले…

सलमान खानचे ‘आयफा’मध्ये ‘त्‍या’ आठवणींने डोळे पानावले…

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेतारकांचा आयफा २०२२ हा सोहळा परदेशात पार पडला. या सोहळ्याची सांगता शनिवारी रात्री उशिरापर्यंत रंगतदार कार्यक्रमांनी झाली. या कार्यक्रमामध्ये सलमान खान भावूक पहायला मिळाला. यावेळी त्याने त्याच्या करिअरमधील चढ-उतार चाहत्‍यांना सांगितले.

सलमानचे डोळे पानावले…

आयफा २०२२ या कार्यक्रमादरम्यान अनेक भावनिक क्षण पहायला मिळाले. सर्वात भावुक क्षण तो होता, ज्यावेळी अभिनेता सलमान खान याने आपल्या करिअरला दिशा देणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या आठवणी सांगण्यास सुरूवात केली. खिशात पैसे नसताना सुनील शेट्टीने केलेली मदत त्याचबरोबर 'बीवी हो तो ऐसी'मधील जेके बिहारीनी दिलेली पहिली संधी हे मी कधीच विसरू शकत नाही. 'फूल और पत्थर' या चित्रपटात निर्माता रमेश तौरानींनी दिलेली संधी, निर्माता बोनी कपूर यांच्यामुळे 'वॉन्टेड' चित्रपटात मिळालेली संधी. या सर्वांमुळे त्याच्या करिअरला उभारी मिळाली. असे अनेक किस्से  सांगताना सलमानचे डोळे पानावले.

पंकज त्रिपाठीने साधला प्रेक्षकांशी संवाद

या वेळी अभिनेता पंकज त्रिपाठी याला प्रेक्षकांनी उस्‍फूर्त प्रतिसाद दिला.  पुरस्‍कार स्‍वीकारल्‍यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधला. उर्वरित पुरस्कार विजेत्यांनाही त्यांचे नातेवाईक, आई-वडील आणि प्रिय मित्रांची आठवण झाली. विकी कौशलने दिवंगत अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news