पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अनेक दिवसांपासून कॅटरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. पण या दोघांनी अजुनही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण सोशल मीडियावर या लग्नाची चांगलीच चर्चा सुरु आहे. लग्न या दोघांचं आहे. पण सोशल मीडियावर सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांच्या मीम्स व्हायरल झाल्या आहेत.
आता कॅटरीना आणि विकी यांच्या दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य राजस्थानमधील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये पोहोचले आहेत. त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. विकी आणि कॅटरीनाच्या लग्न सोहळा 7 ते 9 डिसेंबर दरम्यान चालणार आहेत. विकी आणि कॅटरीनाच्या लग्नाच्या या जल्लोषात सलमान खान सोशल मीडियावरही चर्चेत आहे. त्याचे कारणही खूप मनोरंजक आहे. ट्विटरवर युजर्स सलमान खानबद्दल मजेदार मीम्स बनवत आहेत.
ट्विटरवर यूजर्स सलमान खानबद्दल मीम्स बनवत आहेत. कारण एकेकाळी सलमान खान आणि कॅटरीना यांच्यातील अफेअरची खूप चर्चा होत होती. नंतर रणबीर कपूर आणि कॅटरीनाच्या अफेअरचीही चर्चा होती.
कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. 7 रोजी संगीताचा कार्यक्रम आहे. 8 तारखेला मेंदी आणि 9 डिसेंबरला लग्न होणार आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यातील बरवारा किल्ल्यातील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये दोघांचे लग्न होणार आहे. लग्नाला 120 पाहुणे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.