पुढारी ऑनलाईन डेस्क : रविवारी रात्री (दि. २८) दिल्लीत १६ वर्षीय तरुणीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. साक्षी असे या तरुणाचे नाव आहे. या हत्याकांडातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजने दिल्लीतील नागरिकांना धक्का बसला. या प्रकरणातील प्रमुख संशयित साहिल खान याने अखेर आपली अल्पवयीन मैत्रीण साक्षीचा निर्घृणपणे भोसकून खून करण्यामागचा खरा हेतू उघड केला आहे. (Delhi Sakshi Murder Case Update)
पोलिसांनी मंगळवारी (दि. ३०) रात्री साहिलची चौकशी केली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिलला त्याच्या क्रौर्याबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप नाही. साक्षीच्या हत्येचा डाव त्याने १५ दिवसांपूर्वीच रचला होता. चाकूही त्यासाठी त्याने विकत घेतला, असे त्याने या चौकशीत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. (Delhi Sakshi Murder Case Update)
पीटीआय दिलेल्या वृत्तानुसार, 20 वर्षीय साहिल खानने चौकशीत दिल्ली पोलिसांना सांगितले की, साक्षी तिच्या एक्स बॉयफ्रेंड प्रवीण जैनसोबत पुन्हा एकत्र येणार असल्याचे सांगत होती. पुढे असेही सांगतो की, साक्षीला प्रवीणसोबत परत जायचे होते कारण त्याच्याकडे मोटरसायकल होती. त्याच्याकडे भरपूर पैसा असल्याने साक्षी प्रवीणकडे जाणार होती या कारणास्तव मी तिचा खून केला असा खुलासा साहिलने केला.
दिल्लीच्या शाहबाद डेअरीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, साहिल खान १६ वर्षीय साक्षीचा निर्घृणपणे वार करताना आणि नंतर तिचे शरीर आणि तिचे डोके मोठ्या सिमेंटच्या दगडाने चिरडताना दिसत आहे. तो गुन्ह्याच्या ठिकाणाहून दूर जाताना दिसतो. घटनास्थळावरील लोकांनी बघ्यांची भुमिका घेतल्याचे पहायला मिळते.
हेही वाचा