Delhi Murder Case | साहिल खानची ओळख अन् साक्षीची निर्घृण हत्या | पुढारी

Delhi Murder Case | साहिल खानची ओळख अन् साक्षीची निर्घृण हत्या

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  साहिल सर्फराज खान आणि साक्षी जून 2021 पासून मित्र होते. साहिलच्या प्रोफाईलवर त्याचे फोटो मनगटावर भगवा गंडा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह आहेत. नंतर साक्षी साहिलला टाळू लागली. ती दुसर्‍याच्या प्रेमात पडल्याचा संशय साहिलला येऊ लागला. काही दिवसांपूर्वीच त्याने साक्षीला ठार मारण्याची धमकी दिली होती. साक्षीने तिच्याकडून साहिलसोबत ब्रेकअप केला होता; पण साहिल तिचा पीछा सोडत नव्हता. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाला. रविवारी साहिलने साक्षीला संपविले. (Delhi Murder Case)

आत्याच्या फोनमुळे सापडला

साक्षीची हत्या केल्यानंतर साहिल बुलंद शहर जिल्ह्यातील रिठाळा या गावी त्याच्या आत्याच्या घरी दडून बसला होता. स्वत:चा फोनही त्याने बंद करून ठेवला होता. साहिल इथे आलेला आहे म्हणून आत्याने भावाला (साहिलचे वडील सर्फराज यांना) फोन केला. सर्फराज यांचा फोन पोलिसांनी ट्रॅकवर लावून ठेवलेला होता. साहिल कुठे आहे, हे पोलिसांना या कॉलने कळले. (Delhi Crime News)

20 वार, चाकू डोक्यात फसला, म्हणून मग दगडाने 6 वेळा ठेचले

एवढे क्रौर्य येते कोठून? सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

साक्षीच्या हत्येचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला क्षण सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. साहिलने साक्षीवर चाकूने 20 वार केले. शेवटचा वार करताना चाकू साक्षीच्या डोक्यात अडकला. तेव्हा बाजूला पडलेला भला मोठा दगड उचलून त्याने 6 वेळा साक्षीला ठेचले. एवढे क्रौर्य कोठून येते, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. साहिलचे हुक्का पित असतानाचे रिलही आहेत. साहिलला दारूचेही व्यसन आहे. (Delhi Sakshi Murder Case)

साहिलला 2 दिवस पोलिस कोठडी

आरोपीला पश्चात्ताप नाही : पोलिस

साहिल सर्फराज याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी मंगळवारी रात्रीही साहिलची चौकशी केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिलला त्याच्या क्रौर्याबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप नाही. साक्षीच्या हत्येचा डाव त्याने 15 दिवसांपूर्वीच रचला होता. चाकूही त्यासाठी त्याने विकत घेतला, असे त्याने या चौकशीत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.

साक्षी हत्याकांडाने गहिवरले पंतप्रधान मोदी

भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी मृत साक्षीच्या कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साक्षीच्या हत्येचे फुटेज बघितले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे खासदार हंस यांनी सांगितले. (Delhi girl murder case)

साक्षीच्या मैत्रिणीने मांडली, साहिल खानची कुंडली

साहिल हे नाव हिंदू-मुस्लिम दोघांत असते. त्याचा गैरफायदा साहिल घ्यायचा. तो मनाने हिंदू बनलेला नव्हता. मुलींना हिंदू असल्याचे भासवायचा. साहिल नावाने कुणाला शंका यायला नको म्हणून बरेचदा तो आपले नाव राहुल असल्याचे सांगायचा. रुद्राक्ष, भगवा गंडा वापरायचा. साक्षीला त्याच्याबद्दलची खरी माहिती कळली होती आणि त्यामुळेच त्याने तिला इतक्या क्रूरपणे संपविले, असे मृत साक्षीच्या एका मैत्रिणीने कॅमेर्‍यासमोर सांगितले. दरम्यान, साहिलने पोलिस चौकशीत झबरू नावाच्या युवकाबाबत सांगितले आहे. झबरूनेही साहिलला साक्षीला त्रास न देण्याबाबत बजावले होते, असा जबाबही साहिलने दिला आहे.

Back to top button