Sachin Tendulkar : ‘बनावट जाहिराती’ विरोधात ‘सचिन’ची मुंबई सायबर सेलकडे तक्रार

Sachin Tendulkar : ‘बनावट जाहिराती’ विरोधात ‘सचिन’ची मुंबई सायबर सेलकडे तक्रार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकरच्या अधिकृततेशिवाय फॅट-बर्निंग स्प्रे, फॅट मेल्टिंग पॅच, बेली बर्नर ऑइल यासारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar ) नाव आणि प्रतिमा वापरल्याबद्दल वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, क्रिकेटपटूचे वैयक्तिक सहाय्यक रमेश पारधे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात लोकांविरुद्ध कलम ४२६, ४६५ आणि ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सचिन तेंडुलकरचे वैयक्तिक सहाय्यक रमेश पारधे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दावा केला होता की, एका कंपनीने त्यांची उत्पादने विकण्यासाठी तेंडुलकरच्या नावाची वेबसाइट देखील सुरू केली होती आणि त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी त्याचे नाव आणि छायाचित्रे वापरली होती.

Sachin Tendulkar : फसवणूक, बनावटगिरी आणि मानहानीचा गुन्हा

सचिन कोणत्याही प्रकारे उत्पादनांशी संबंधित नसल्यामुळे, कंपनी केवळ त्याच्या ब्रँडचा गैरवापर करत नाही तर त्यांच्या स्वत: च्या ग्राहकांची फसवणूक देखील करत आहे," असे पोलिस उपायुक्त (सायबर) बलसिंग राजपूत म्हणाले. कंपनीशी संबंधित लोकांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक, बनावटगिरी आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news