सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३ ची महाविेजेती ठरली गौरी पगारे

gauri pagare
gauri pagare

पुढारी ऑनलाईन डेस्क – झी मराठी वाहिनीवर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'२०२३ चा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मृण्मयी देशपांडे मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या 'गौरी अलका पगारेने' विजेती होण्याचा मान पटकावला.

यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या श्रावणी वागळे आणि जयेश खरेला प्रत्येकी १,००,००० चा धनादेश देण्यात आला.

विजेतेपद पटकवल्यावर आपला आनंद व्यक्त करताना गौरी म्हणाली, "मला खूप आनंद होतोय की, मला 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' २०२३ चा किताब मिळाला. माझ्याकडे शिक्षण नसताना ही मी इतक्या उंचावर पोहोचली. माझ्या या यशात गुरुजी सुरेश वाडकर, सलील दादा आणि वैशाली ताईची खूप मेहनत आहे. मी विजेतेपद मिळवलं यात त्यांचं श्रेय आहे."

महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी अलका पगारे, प्रथम उपविजेता ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने या पर्वाला अजूनच बहार आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news