युद्धात भारत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो; रशियन परराष्ट्रमंत्री लावरोव

युद्धात भारत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो; रशियन परराष्ट्रमंत्री लावरोव
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनसोबत सुरु असलेल्या युध्दात भारत मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, असे रशियाचे (russia india relations) परराष्ट्र मंत्री सर्जेई लावरोव यांनी शुक्रवारी येथे सांगितले. भारत हा महत्वपूर्ण देश आहे आणि वाद सोडवण्यात यश येईल असे भारताला वाटत असेल तर ही मध्यस्थता स्वीकारण्यास रशिया तयार आहे, असे ते म्हणाले. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या लावरोव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेत युद्धासह विविध विषयांवर चर्चा केली.

युक्रेनसोबत (russia india relations) सुरु असलेल्या युद्धाची तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती लावरोव यांनी मोदी यांना दिली. हिंसाचार संपण्यासाठी भारत पुन्हा एकदा आवाहन करीत आहे, तसेच सकारात्मक योगदान देण्यासाठी आपण तयार आहोत, असे मोदी यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.

भारताच्या भूमिकेची प्रशंसा (russia india relations)

पंतप्रधान मोदी (russia india relations) यांची भेट घेण्याआधी लावरोव यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या भूमिकेची लावरोव यांनी यावेळी प्रशंसा केली. आमचे पश्चिमी मित्र सध्या सर्व आंतरराष्ट्रीय विषयांचा संबंध युक्रेन वादाशी जोडून या विषयांचे महत्त्व कमी करु पाहत आहेत. अशा स्थितीत भारताने घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. भारताने संपूर्ण विवाद जाणून आणि समजावून घेतला तसेच त्यानंतर कोणताही निर्णय एकतर्फी घेतला नाही, असे लावरोव यांनी नमूद केले.

भारताला (russia india relations) आवश्यक असलेल्या कोणत्याही वस्तूचा पुरवठा करण्यास रशिया तयार असल्याचे सांगून लावरोव म्हणाले की, भारत आणि रशिया यांच्यातले संबंध दीर्घकाळापासून चांगले आहेत. हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या काही दशकांत दोन्ही देशांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. दोन देशांत धोरणात्मक भागीदारीदेखील आहे. स्वातंत्र्यापासून भारताचे परराष्ट्र धोरण वैशिष्ट्यपूर्ण राहिलेले आहे. जवळपास असेच धोरण रशियाचे राहिलेले आहे. देशहित पाहून दोन्ही देश आपली ध्येयधोरणे निश्चित करतात आणि त्याचमुळे रशिया, भारत जगात मोठे ठरतात.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी युक्रेन प्रकरण चर्चेतून सोडविले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोना महारोगराईच नव्हे तर इतर विषयांच्या अनुषंगाने सध्या जगातले वातावरण खूप बदलले आहे, असे सांगतानाच विविध क्षेत्रातील दोन्ही देशांदरम्यानचे सहकार्य वाढविले जाणार असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी रशियावर प्रतिबंध घातले आहेत. भारताने देखील रशियावरील प्रतिबंधात सामील व्हावे आणि त्या देशाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. मात्र भारताने या मागणीला फारसे महत्व दिलेले नाही. या साऱ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर लावरोव यांच्या भारत दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे युद्ध सुरु झाल्यापासून कोणत्याही रशियन मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. रशियाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात आतापर्यंत अनेक प्रस्ताव आलेले आहेत, मात्र त्यावरील मतदानापासून भारताने स्वतःला वेगळे ठेवलेले आहे. भारताच्या या भूमिकेवर काही दिवसांपूर्वी अमेरिकन राष्ट्रपती जो बिडेन यांनी नाराजी दर्शवली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news