Russia-Ukraine Nissan : निसान कंपनीचा रशिया सोडण्याचा मोठा निर्णय! फक्त एक युरोमध्ये विकला प्रकल्प

Russia-Ukraine Nissan : निसान कंपनीचा रशिया सोडण्याचा मोठा निर्णय! फक्त एक युरोमध्ये विकला प्रकल्प

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानी ऑटो कंपनी निसानने (NISSAN) आपला प्रकल्प आणि रशियन बाजारपेठ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे कंपनीने रशियामधील आपला संपूर्ण व्यवसाय केवळ एक युरोमध्ये NAMI या सरकारी मालकीच्या युनिटकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. निसान कंपनीने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, $687 दशलक्ष इतके कंपनीचे नुकसान झाले आहे. रशिया युक्रेनमधील संघर्षानंतरचा हा मोठा निर्णय कंपनीने दिला आहे. (Russia-Ukraine Nissan)

देशातील उत्पादन बंद करण्यास भाग पाडल्यानंतर काही महिन्यांनंतर हे महत्त्वाचे पाऊल कंपनीने घेतलेले आहे. रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण (Russia-Ukraine Nissan) केल्यानंतर, निसान (Nissan) कंपनी रशियातून बाहेर पडणारी मोठी ऑटोमेकर कंपनी होती.

निसानच्या या निर्णयानंतर मित्सुबिशी ही आणखी एक मोठी जपानी कंपनी रशियन बाजारापेठेतून बाहेर पडण्याचा विचार करत आहे, अशी माहिती निक्केई एशिया या माध्यमाने दिली आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर निसानने रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथील उत्पादन प्रकल्प बंद केला होता. त्यानंतर तेथील प्रकल्प आता सरकारी मालकीच्या कंपनीकडे सोपवेल अशी माहिती दिली आहे. हे सर्व निर्णय हे रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news