russia ukraine war : युक्रेनचा रशियावर पलटवार ! बेल्गोरोदमध्ये एअरस्ट्राईक

बेल्गोरोद : युक्रेन हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला ऑईल डेपो. (एपी फोटो)
बेल्गोरोद : युक्रेन हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला ऑईल डेपो. (एपी फोटो)
Published on
Updated on

कीव्ह / मॉस्को; वृत्तसंस्था : एकीकडे वाटाघाटीही सुरू असताना रशिया आणि युक्रेनदरम्यान (russia ukraine war) 36 व्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. रशियन लष्कर, हवाई दल युक्रेनमध्ये शिरल्यानंतर आजतागायत बचावात्मक पवित्र्यात असलेल्या युक्रेनने आता आक्रमक रूप धारण केले आहे. अर्थात युक्रेनने रशियावर अनेक हल्ले, प्रतिहल्ले केले, पण ते आजवर युक्रेनच्या हद्दीतच. पहिल्यांदाच युक्रेनच्या सैन्याने ती ओलांडून रशियातील एका शहरावर हवाई हल्ला केला आहे. युक्रेन हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स शुक्रवारी रशियातील पश्‍चिमेकडच्या बेल्गोरोद शहरात शिरले आणि एका ऑईल डेपोवर हवाई हल्ला केला. डेपो उद्ध्वस्त झालाच, दोन लोक या हल्ल्यात जखमीही झाले.

बेल्गोरोद शहर युक्रेन (russia ukraine war) सीमेपासून 40 किमी अंतरावर आहे. युद्धात दोन्ही देशांचे जीवित व वित्तहानी सुरू आहे. युक्रेनच्या 'प्रॉसिक्युटर जनरल' कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रशियन हल्ल्यांत आजवर 153 बालकांचाही मृत्यू झाला आहे आणि 245 वर मुले जखमी झाली आहेत.

'चेर्नोबिल न्यूक्लिअर'वर रशियन ताबा कायम (russia ukraine war)

रशियन लष्कराने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनच्या चेर्नोबिल न्यूक्लिअर ऊर्जा प्रकल्पावर कब्जा जमविला होता. येथून आता रशियन सैनिकांनी माघारी जाणे सुरू केले आहे. सैनिक चेर्नोबिल सोडून आता बेलारूसकडे निघाले आहेत, असे अमेरिकन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

रोज दहा लाख बॅरेल कच्चे तेल (russia ukraine war)

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाचे वाढलेले दर आटोक्यात आणण्यासाठी पुढील सहा महिन्यांपर्यंत दररोज 10 लाख बॅरेल कच्चे तेल पुरविले जाईल, अशी घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.

अन्य घडामोडी (russia ukraine war)

रशियातून गॅस खरेदी करण्यासाठी परदेशी ग्राहकांना आता रशियन बँकांमध्ये रुबल खाती सुरू करावी लागतील. इथून पुढे गॅसची बिले याच खात्यांमार्फत स्वीकारली जातील, असे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी जाहीर केले.

युक्रेनमधून रशियन सैनिक माघारी फिरत नसून, ते डोनबासवर संपूर्ण नियंत्रणासाठी एकत्रित येत आहेत, असे नाटोचे महासचिव जेन्स स्टोल्टेनबर्ग यांचे म्हणणे आहे.

युक्रेनचे नुकसान

  • रशियन लष्कराने आजवर 1 हजार 370 क्षेपणास्त्रे युक्रेनमध्ये डागलेली आहेत. त्यात हजारो इमारतींसह 15 विमानतळे उद्ध्वस्त झाली आहेत.
  • रशियाने युक्रेन लष्कराच्या एका तळावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात 2 जण मरण पावले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news