पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीय. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला एक फोटो शेअर केल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. तिने एका व्यक्तीसोबत फोटो शेअर केला असून त्या फोटोला Happy Birthday my Happy place @doctorrohitshinde ❤️ July belongs to us !!✨ अशी कॅप्शन दिलीय. तिने हार्ट इमोजी शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिच्या प्रेमाबद्दल कयास लावायला सुरुवात केली. (Ruchira Jadhav)
रुचिराने रोहित शिंदे या व्यक्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या रोहित डॉक्टर आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रुचिराने फोटो शेअर केले आहेत. तर रोहितनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फोटो शेअर केले आहेत. त्याने शेअर केलेल्या तिन्हीही फोटोंमध्ये तो रुचिरासोबत दिसतो. दोघेही आनंदात असल्याचे दिसतात.
शिवाय या फोटोंना Happy birthday to the angel that lights up my life. I am so grateful that I was able to find my way to you, and I can love and hold you for the rest of my life. You are Mine❤️ अशी कॅप्शन लिहिण्यात आलेली आहे. या कॅप्शनला रिप्लाय देत डॉ. रोहितने लिहिलंय-And my happiness is you❤️.
या फोटोंना नेटकऱ्यांकडून भरभरून कमेंट्स मिऴाल्या आहेत. एकाने लिहिलंय-@doctorrohitshinde You find the miracle yaar!❤️?, May God bless you with love and care. Enjoy every moment, every day of your life. Happy Birthday ? ma'am ?@ruchira_rj, Looks so beautiful together ❤️.
हेदेखील वाचा-