RSS Web Series: ‘चा प्रवास आता येणार छोट्या पडद्यावर

RSS Web Series
RSS Web Series

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: सर्वात मोठे संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) इतिहास लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर सादर केला जाणार आहे. वेब सिरीजच्या माध्यमातून संघाचा ९८ वर्षांचा इतिहास उलगडला जाणार असून, विजयादशमीच्या दिवशी 'वन नेशन' नावाच्या या वेब सीरिजचे पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. (RSS Web Series)

संघाच्या स्थापनेला ९८ वर्षे उलटली असून, २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. या वर्षात ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वेब सिरीजच्या दिग्दर्शनासाठी तब्बल सहा दिग्दर्शक एकत्र येणार आहेत. यात प्रियदर्शन, विवेक अग्निहोत्री, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यू माथन, मंजू बोरा आणि संजय पूरण सिंग चौहान यांचा समावेश आहे. शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संघ परिवाराची माहिती नव्या पिढीला मिळावी हा यामागचा उद्देश असला तरी निवडणुकीचे वर्ष समोर असताना हा उपक्रम चर्चेचा विषय ठरू शकतो. (RSS Web Series)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news