पुढारी ऑनलाईन डेस्क
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित आरआरआर ( RRR Movie ) चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर पडले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमधील निर्बंध पुन्हा कडक करण्यात येत आहेत. यामुळे ७ जानेवारी रोजी होणार्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याचे 'आरआरआर' च्या टीमने टिवटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने अनेक राज्यांमध्ये शिरकाव केला आहे. याची तीव्रात अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी चित्रपटगृह बंद करण्यात आली आहे. यामुळेच अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. यापूर्वी 'जर्सी' चित्रपटाचेही प्रदर्शन टाळण्यात आले. आता आरआरआर चित्रपटाचेही ( RRR Movie ) प्रदर्शन अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहिती आरआरआरच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, "सर्वांच्या हिताचा विचार करुन आम्हाला चित्रपट प्रदर्शनाची तारीख टाळावी लागत आहे. आम्हाला सर्व चाहते आणि प्रेक्षकांचे मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व प्रयत्नानंतरही काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. देशातील काही राज्यांमधील चित्रपटगृह बंद होत आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. सर्वांनी आपला उत्साह काही काळासाठी कायम ठेवावा. आम्ही ग्वाही देतो की भारतीय सिनेमाचे वैभव आम्ही योग्यवेळी घेवून येवू".
हेही वाचलं का?