ram charan-upasana : RRR स्टार राम चरणच्या घरी १० वर्षांनंतर पाळणा हलणार

ram charan -upasana
ram charan -upasana

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगु स्टार राम चरणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (ram charan-upasana) आरआरआर आणि 'मगधीरा' सारख्या चित्रपटांचे स्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना हे दोघेही आई-वडील होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेलुगु इंडस्ट्रीतील आयकॉन आणि राम चरणचे वडील आणि मेगास्टार चिरंजीवी यांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. चिरंजीवीने भगवान हनुमानाच्या फोटोसह ही घोषणा शेअर केलीय. (ram charan-upasana)

चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये भगवान हनुमानाचा फोटो आहे आणि त्यासोबत ही गोड बातमी लिहिली आहे. या फोटो पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'श्री हनुमानजींच्या कृपेने आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की उपासना आणि राम चरण त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत.

आजोबा बनल्याचा किती आनंद झाला हे चिरंजीवीच्या या पोस्टवरून दिसून येते.

१० वर्षांपूर्वी झाले होते लग्न

दक्षिणेतील बड्या स्टार्सपैकी एक असलेल्या राम चरण आणि उपासना कामिनेनी यांनी २०१२ मध्ये लग्न केले. लग्नाच्या दहा वर्षांनंतर या जोडप्याच्या घरी पाळणा हलणार आहे. या वर्षी जुलैमध्ये उपासना प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत होती. तिला सध्या मूल नको असल्याचे तिने सांगितले होते.

राम चरण स्वत: त्याच्या मुलाखतीमध्ये म्हणताना दिसला की, सिनेमा हे त्याचे पहिले प्रेम आहे आणि मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असल्याने चाहत्यांना खूश करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. राम चरणने असेही म्हटले होते, फॅमिली प्लॅनिंग केल्यानंतर तो आपल्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो. उपासनाचे स्वतःचे जीवनाचे ध्येय आहेत, जे तिला पूर्ण करायचे आहेत. अशा परिस्थितीत दोघेही काही वर्षांच्या बाळाच्या नियोजनाचा विचार करत नाहीत.

आता या जोडप्याने आता त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगू आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपट कुटुंबांपैकी एक, कोनिडेला कुटुंब त्यांच्या पुढच्या पिढीसाठी नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. चिरंजीवी आणि राम चरण या दोघांचे चाहते सोशल मीडियावर या बातमीबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news