पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर ऋषभ पंत यांच्या एका जाहिरातीवर शास्त्रीय गायक व संगीतकारांनी टीका केला आहे. ( Rishabh Pant ad ) शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, सतारवादक पूरबायन चॅटर्जी यांनी ट्विट करत या जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित जाहिरात ही मागील महिन्यात प्रसिद्ध झाली होती.
ड्रीम ११ च्या जाहिरातीमध्ये ऋषभ पंत हा शास्त्रीय गायक झाला असता तर काय झालं असते, असे दाखविण्यात आले आहे. यामध्ये पंत हा शास्त्रीय गायनाची खिल्ली उडविताना दिसतो. यावर शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी ट्विट केली आहे की, "या जाहिरातीलमधील गलिच्छपणा व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आपल्या देशातील समृद्ध वारशाची खिल्ली उडविताना तू मूर्ख दिसत आहेस." या जाहिरातीला त्यांनी "घृणास्पद आणि कुरूप" असेही संबोधले आहे.
सतारवादक पूरबायन चॅटर्जी यांनी ट्विट केले आहे की, " ही जाहिरात भारतीय शास्त्रीय संगीताचा अपमान करण्यासारखीच चित्रित केली आहे. हे पाहून मला धक्का बसला. यामुळे मी व्यथित झाले आहे असे प्रथमच घडत आहे असे नाही. त्यामुळे हे माफी योग्य आहे, असे मला वाटत नाही. संगीत ही एक महान कला प्रकार आहे. ज्याचा जगभरात आदर केला जातो. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारखे दिग्गज क्रिकेटपटूंचे आम्ही समर्थन करतो. भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा भाग आहे आणि भारताचे स्वाभिमानी नागरिक म्हणून आपण आपल्या समृद्ध सांस्कृतीचा आदर केला पाहिजे,"