IPL2023 Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल ठरला आयपीएल ‘टाॅपर’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज

IPL2023 Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल ठरला आयपीएल ‘टाॅपर’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal)  IPL 2023 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार बळी घेत इतिहास रचला. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चहल आता आयपीएलमध्ये  सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलने ब्राव्होपेक्षा कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी केल्यामुळे त्याचे नाव यादीत सर्वात वरचे आहे.

चहलने (Yuzvendra Chahal) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध चार विकेट घेतल्या. चहल आणि ब्राव्हो दोघांच्याही 183-183 विकेट आहेत. या यादीत पहिल्या पाचमध्ये चार भारतीय फिरकीपटू असून त्यात पियुष चावला, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन यांचाही समावेश आहे. (IPL2023 Yuzvendra Chahal)

आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

183 – युझवेंद्र चहल
183 – ड्वेन ब्राव्हो
174 – पियुष चावला
172 – अमित मिश्रा
171 – रविचंद्रन अश्विन

बंगळुरूसाठी चहल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

चहलच्या (Yuzvendra Chahal) नावावर आयपीएलचा (IPL2023) मोठा विक्रम आहे. त्याने 142 सामन्यांमध्ये 8.08 च्या इकॉनॉमी रेटने 19.41 च्या सरासरीने 183 बळी घेतले आहेत. चहल २०१४-२०२१ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला. चहलने आरसीबीसाठी 113 सामन्यांमध्ये 139 विकेट घेतल्या. 2022 मध्ये आरआरमध्ये सामील झाल्यापासून चहलने 28 सामन्यांत 44 बळी घेतले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news