आरपीआय आठवले गट लोकसभेच्या २० ते २५ जागा लढवणार: रामदास आठवले

file photo
file photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या ४०० जागा निवडून येतील. तसेच या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) २०-२५ जागा लढवणार असल्याचे आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी सांगिले. मात्र, त्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. विविध राज्यांमध्ये पक्षविस्तार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला देशभरातुन राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते. पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे, सदस्यता नोंदणी गतीने झाली पाहिजे यासह विविध विषयांवर विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आरपीआय आठवले गट एनडीएमध्ये आहे. एनडीए देशभरात मजबूत होत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भाजपला समर्थन दिले. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढु शकत नाही मात्र मित्रपक्षांना निवडुन आणण्यासाठी मदत करु शकतो, मात्र जिथे पक्षाची परिस्थिती चांगली असेल तिथे लढु शकतो असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. मात्र, काहीही कारण नसताना कॉंग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी त्यांच्यावर टीका करत आहे. इंडिया आघाडीच्या वतीने आरोप केला जातो की, भाजप संविधान बदलत आहे मात्र संविधान कोणीही बदलू शकत नाही. कॉंग्रेसचे सरकार असताना बाबासाहेब मेमोरियलसाठी मी स्वतः तत्कालीन पंतप्रधानांशी बोललो होतो मात्र काहीही झाले नाही. याउलट पंतप्रधान मोदींनी काम केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मीती केली. बाबासाहेबांच्या नावाने अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news