RCB VS MI : मुंबई संघ कोंडी फोडणार?, आरसीबीविरुद्ध आजचा सामना महत्त्वपूर्ण

RCB VS MI : मुंबई संघ कोंडी फोडणार?, आरसीबीविरुद्ध आजचा सामना महत्त्वपूर्ण
Published on
Updated on

पुणे; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स (RCB VS MI) यांच्यातील सामना शनिवारी येथील एमसीए स्टेडियमवर होणार असून आपल्या पहिल्यावहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील असेल.

सध्या गुणतालिकेत रोहित शर्माच्या (RCB VS MI) नेतृत्वाखालील मुंबईचा संघ तळाला असून लागोपाठच्या पराभवांमुळे रोहितला आपले वैफल्य लपवता आलेले नाही. या संघाने सर्वाधिक म्हणजे पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, यंदा त्यांना लागोपाठ तीनदा हार पत्करावी लागली आहे. ठरलेल्या नियोजनानुसार त्यांची कामगिरी झालेली नाही याचीच टोचणी रोहित शर्माला लागून राहिली आहे. ईशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरान पोलार्ड असे दिग्गज खेळाडू असूनही मुंबईच्या पदरी पराभवच पडतोय. शनिवारच्या सामन्यात तरी त्यांची ही पराभवाची मालिका खंडित होईल, अशी अपेक्षा करूनच हा संघ मैदानात उतरेल.

फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB VS MI) तीन सामन्यांतून चार गुणांची कमाई केली आहे. दोन विजय आणि एक पराभव अशी त्यांची आतापर्यंतची कामगिरी आहे. हा संघ शनिवारच्या लढतीत तिसर्‍या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, डेव्हिड विली असे उत्तमोत्तम खेळाडू या संघात आहेत. त्यामुळे उद्याचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केला तर आरसीबीचा संघ मुंबईपेक्षा जास्त बलवान असल्याचे दिसत आहे. जर या सामन्यात मुंबईच्या पदरी पराभव पडला तर मात्र अंतिम चार संघांत प्रवेश करणे हे त्यांच्यासाठी केवळ स्वप्नच ठरू शकेल.

आकडे बोलतात…. (RCB VS MI)

मुंबई आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 29 सामने आयपीएलमध्ये झाले असून त्यातील 17 सामने मुंबईने जिंकले आहेत. 12 सामन्यांत आरसीबीने बाजी मारली आहे. मुंबईने 235 अशी सर्वोच्च धावसंख्या तर 122 अशी नीचांकी धावसंख्या नोंदवली आहे. आरसीबीने 213 अशी सर्वोच्च तर 111 अशी नीचांकी धावसंख्या नोंदवली आहे.

संघ यातून निवडणार :

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन एलन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभूदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीथ सिसोदिया, डेव्हिड विली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news