Rohit Sharma injured : टीम इंडियाला मोठा धक्‍का, रोहित शर्मा जखमी; रुग्‍णालयात दाखल

Rohit Sharma injured : टीम इंडियाला मोठा धक्‍का, रोहित शर्मा जखमी; रुग्‍णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि बांगलादेश वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ( Rohit Sharma injured )

Rohit Sharma injured : स्‍लीपमध्‍ये क्षेत्ररक्षण करताना जखमी

सिराजच्‍या गाोलंदाजीवर राोहित शर्मा स्‍लीपमध्‍ये क्षेत्ररक्षण करत होता. या वेळी झेल पकडताना त्‍याच्‍या हाताला दुखापत झाली. अंगठ्याला जबर मार लागला. रोहितच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याला मैदान सोडावे लागले.

या घटनेबाबत 'बीसीसीआय'ने माहिती दिली आहे की, "रोहित शर्माच्‍या अंगठ्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तपासणीनंतर तो रुग्‍णालयात दाखल झाला आहे. तेथे त्याच्या अंगठ्याचे स्कॅन होणार आहे." आता केएल राहुल संघाचा कर्णधार म्हणून मैदानात आपली भूमिका बजावत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news