पुढारी ऑनलाईन: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत होऊनही शेवटपर्यंत फलंदाजी केली. त्याच्या या लढवय्या वृत्तीवर त्यांची पत्नी रितिकाही भावूक झाली. रोहितच्या झुंजार खेळीनंतर पत्नी रितिकाने तिच्या इंन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
रोहित शर्मा याच्या अप्रतिम खेळीवर त्याची पत्नी रितिकाने म्हटलंं आहे की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुम्ही ज्याप्रकारचे व्यक्ती आहात, त्यावर मला गर्व आहे. या अवस्थेत खेळणे आणि त्याहून अप्रतिम खेळी करणे ही एक दिमाखदार कामगिरी आहे.
बांगलादेशविरूद्धचा दुसरा वनडे सामना भारताने गमावला आहे.या पराभवामुळे भारताने मालिका गमावली. या सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत झाली हाोती. तरीही अंगठ्याला दुखापत असूनही रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने ५१ (चेंडू २८) धावांची झुंझार खेळी केली. या कामगिरीने त्याने चाहत्यांची मने जिंकली. त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला.