Rohit Sharma Ducks : रोहितचा सोळावा भोपळा

Rohit Sharma Ducks : रोहितचा सोळावा भोपळा

चेन्नई; वृत्तसंस्था : गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा धावा करू शकला नाही, त्यामुळे त्याने सीएसकेविरुद्ध फलंदाजी क्रम बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याची रणनीती यशस्वी झाली नाही आणि दीपक चहरच्या चेंडूवर रोहित खराब शॉट खेळून झेलबाद झाला. आयपीएलमध्ये तो शून्यावर आऊट होण्याची ही 16 वी वेळ आहे. या लीगमध्ये तो शून्यावर आऊट होण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने दिनेश कार्तिक, सुनील नरेन आणि मनदीप सिंग यांना मागे टाकले. या लीगमध्ये तिघेही 15-15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. (Rohit Sharma Ducks)

गौतम गंभीरचा विक्रम मोडला

रोहित शर्मा आता आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधार म्हणून तो या लीगमध्ये 11 व्यांदा शून्यावर आऊट झाला. त्याचबरोबर रोहितने गौतम गंभीरला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून गौतम गंभीर 10 वेळा शून्यावर बाद झाला होता. (Rohit Sharma Ducks)

दीपक चहर विरुद्ध रोहितची नेहमीच तारांबळ

आयपीएलमध्ये दीपक चहरविरुद्ध रोहित शर्माची बॅट नेहमीच शांत राहिली आहे. त्याने आतापर्यंत दीपक चहरच्या 49 चेंडूंचा सामना केला आहे, ज्यात त्याने 60 धावा केल्या आहेत आणि तीनदा तो बाद झाला आहे. 20 डॉट बॉल्स खेळताना त्याने दीपकच्या चेंडूंवर 9 चौकार मारले आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 122.44 राहिला आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news