पक्ष फुटला तरीही आम्ही लढत राहणार : रोहित पवार

पक्ष फुटला तरीही आम्ही लढत राहणार : रोहित पवार
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराडला जाणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र त्याआधी पुण्यातील शरद पवारांच्या मोदी बागेच्या निवास्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. रोहित पवारही तिथे उपस्थित आहेत. यावेळी ते माध्यमाशी बोलत होते.

ते म्हणाले अजित दादा आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी जो निर्णय घेतला आहे. तो निर्णय सर्वसामान्य लोकांना मान्य नाही. मतदार यामुळे दुखावला गेला आहे. आपण मतदान करून चूक केली का काय? अशी भावना सर्वसामान्यजनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे राजकारणात येऊन चूक केली अशी भावना निर्माण होतीय, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

जनतेची काम सोडून लोक आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जनतेच्या प्रश्नांविषयी बोललं गेलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे मनात विचार येतो की राजकारण करायचं की नाही… पण एक गोष्ट मनात कायम आहे. महाराष्ट्राच्या रक्तात लढणं आहे. त्यामुळे तोच विचार पुन्हा बळ देतो, असेही रोहित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अजित पवार जातील यांचा कुणालाही अंदाज नव्हता. भाजप राष्ट्रवादी पक्ष फोडणार हे मात्र लक्षात आलं होतं. पण पक्ष जरी फुटला तरी आम्ही लढत राहणार आहोत. पण ही संघर्षाची वेळ आहे. मुंबईला राष्ट्रवादीची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. त्या बैठकीला आम्ही तिथे उपस्थीत राहणार आहोत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news