पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज (दि.२९) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याने मराठा समाजासह राजकीय क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहीत पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर "जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल." असं म्हणत हल्लाबोल केला आहे.(Rohit Pawar On Maratha Reservation)
राेहित पवार यांनी आपल्या पाेस्टमध्ये म्हटलं आहे की, "समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय? सरकारला थोडीजरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या. दुर्दैवाने त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. तशी वेळ येऊ देऊ नका, ही कळकळीची विनंती!"
रोहित पवार यांनी काढली होती. मात्र, चार दिवसानंतर ही यात्रा मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे, या हेतूने स्थगित केली पुणे ते नागपूर अशी ८०० किलोमीटरची ही युवा संघर्ष यात्रा ४२ दिवस चालणार होती. यावरुन विरोधी गटातून टीका केली जावू लागली. यावर त्यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.
"युवा संघर्ष यात्रा स्थगित केल्याबद्दल काही नेत्यांनी उधळलेली मुक्ताफळं बातम्यांत बघायला मिळाली. पण त्यांना मला सांगायचंय की, त्यांच्या या वक्तव्यावरूनच त्यांच्यातील असंवेदनशीलता दिसते. आरक्षणासंदर्भात लोकांच्या मनात किती खदखद आणि असंतोष आहे, हे माझ्यासारख्या पहिल्या टर्मच्या आमदाराला कळतं. त्यामुळं स्वाभिमानी महाराष्ट्र जळत असताना ते टाळण्यासाठी दोन पावलं मागं घेण्यात काय चूक आहे? पण माझ्या वयापेक्षाही ज्यांची राजकीय कारकीर्द जास्त आहे त्या नेत्यांना हे कळत नसेल तर यातून त्यांची बौद्धिक लायकीच उघड होते.. शिवाय 'गुत्त्या'ची भाषा कळणाऱ्याला मुद्द्याची भाषा कशी कळणार, हाही प्रश्नच आहे. असो!त्यांना आज मी काही उत्तर देत नाही, पण ज्यावेळी पुन्हा युवा संघर्ष यात्रासुरू होईल त्यावेळी त्यांना परस्पर उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून, त्यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्य सरकारने नेमलेल्या न्या. संदीप शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हेही वाचा