Pune News : दहीहंडीनिमित्त बाहेर पडताय तर ही बातमी वाचाच; पुण्यातील ‘हे’ रस्ते असणार बंद…

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांत दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विशेषतः शहरातील मध्यभागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड सायंकाळी 5 ते दहीहंडी फुटेपर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते (बाबू गेनू चौक), साहित्य परिषद चौक नवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

असा आहे बदल

  • शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने, शास्त्री रोडने जावे.
  • पूरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पूरम चौकातून टिळक रोडने – अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी.रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच पूरम चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
  • स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : जंगली महाराज रोडने – झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
  • बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असणार आहे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाता येईल.
  • रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा.
  • सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news