‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्‍का, ‘हा’ पक्ष हाेणार ‘रालोआ’त सहभागी?

राष्‍ट्रीय लोक दल पक्षाचे सर्वेसर्वा जयंत चौधरी.
राष्‍ट्रीय लोक दल पक्षाचे सर्वेसर्वा जयंत चौधरी.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  जनता दल संयुक्‍तचे  (जेडीयू ) सर्वेसर्वा नितीश कुमारांनी भाजप विराेधी पक्षांची 'इंडिया' आघाडीची साथ सोडल्‍यानंतर उत्तर प्रदेशमधील राष्‍ट्रीय लोक दल (आरएलडी) पक्ष भाजप नेतृत्त्‍वाखालील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सहभागी होण्‍याच्‍या तयारीत आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा जयंत चौधरी यांनी मंगळवार, ६ फेब्रुवारीला दिल्‍लीत भाजपच्‍या एका वरिष्‍ठ नेत्‍यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये या पक्षाला चार जागा देण्‍याचा प्रस्‍ताव आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने सूत्रांच्‍या हवाल्‍याने दिले आहे. ( RLD's Jayant Chaudhary may join hands with BJP)

जयंत चौधरी आगामी लोकसभा निवडणुकीत संभाव्य युतीसाठी भाजपशी चर्चा करत आहेत. उत्तर प्रदेशमधील कैराना, बागपत, मथुरा आणि अमरोहा या चार लोकसभा जागा त्‍यांना देण्‍याची चर्चा झाली. जयंत चौधरी यांनी मंगळवारी दिल्लीत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली, ज्यामुळे दोन्ही पक्ष निर्णायक निवडणुकीत जाण्यासाठी केवळ काही महिने हातमिळवणी करतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. ( RLD's Jayant Chaudhary may join hands with BJP)

ममता, नितीश कुमारांनंतर आता जयंत चाैधरीही इंडिया आघाडीपासून दुरावणार

इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्‍या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्‍ये स्‍वबळवर निवडणक लढविण्‍याचा निर्णय घेतला. यानंतर बिहारमध्‍ये जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्‍हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली. आता यानंतर इंडियाआघाडीपासून जयंत चौधरीही दुरावताना दिसत आहेत. त्यांनी नुकतीच उत्तर प्रदेशातील छपरौली येथील नियाेजित जाहीर सभा लांबणीवर टाकली आहे. तसेच मागील काही दिवस ते संसदेही अनुपस्‍थित होते. जयंत चौधरी यांचे आजोबा चरणसिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. रालोआत सहभागी होण्‍याच्‍या चर्चेमुळे त्‍यांचा हा कार्यक्रम लांबणीवर पडल्‍याचीही चर्चा आहे. ते रालोआत सहभागी झाल्‍यास चरणसिंग यांच्‍या पुतळा अनावरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्‍थित राहु शकतात, अशीही चर्चा उत्तर प्रदेशच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अलीकडच्या काळात चौधरी यांची संसदेत अनुपस्थिती हे सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करण्याकडे त्यांचा कल असल्याचे मानले जात आहे. ( RLD's Jayant Chaudhary may join hands with BJP)

समाजवादी पार्टी आणि राष्‍ट्रीय लोक दलमध्‍ये मतभेद ?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील जागा वाटपासंदर्भात समाजवादी पार्टी आणि राष्‍ट्रीय लोक दल यांच्‍यात चर्चा झाली हाेती. यावेळी जयंत चौधरी यांच्‍या पक्षाला सात जागा देण्‍यावर निर्णय झाला. मात्र मुझफ्फरनगर, बिजनौर आणि कैराना या तीन मतदारसंघांवर मतभेद निर्माण झाले. समाजवादी पार्टीने आपले उमेदवार राष्‍ट्रीय लोक दलच्‍या सहकार्याने निवडणूक लढेल, अशी इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे  राष्‍ट्रीय लाेक दलातच अंतर्गत मतभेद निर्माण झाल्‍याने जयंत चाैधरी यांनी भाजपमध्‍ये सहभागी हाेण्‍याचा निर्णय घेतल्‍याचे मानले जात आहे.

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्‍ये चर्चा सुरु आहे. समाजवादी पार्टीने १६ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेससाठी 11मतदारसंघ प्रस्तावित केले आहेत. मात्र काँग्रेस २५ जागांसाठी आग्रही आहे. उत्तर प्रदेशमध्‍ये २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. समाजवादी पार्टीने मायावतींच्या बहुजन समाज पक्षासोबत युती करत पाच जागा जिंकल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशमध्‍ये 65 जागा लढविण्‍याच्‍या तयारीत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news