Dhruv Jurel : ‘पंतचे पुनरागमन होईल;पण ‘हा’ युवा खेळाडू ठरेल धोनीचा वारसदार’

Dhruv Jurel : ‘पंतचे पुनरागमन होईल;पण ‘हा’ युवा खेळाडू ठरेल धोनीचा वारसदार’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केवळ दोन कसोटी सामने खेळलेल्या यष्टिरक्षक-फलंदाज जुरेलची तुलना भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी होत आहे. भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी जुरेल याची तुलना टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्‍याशी केली आहे. यानंतर भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी ही ध्रुव जुरेलची धोनीसोबत बरोबरी करत जुरेल ही त्याच्या सारखी कारकिर्दी गाजवेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे. (Dhruv Jurel)

ध्रुव जुरेलची इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात निवड करण्यात आली. तेव्हा त्याने 2022 च्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करून केवळ 15 प्रथम-श्रेणी सामने खेळले होते. आता भारतासाठी फक्त दोन कसोटी खेळल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून केलेल्या त्याच्या कामगिरीमुळे त्याची भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत बरोबरी केली जात आहे.

2022 च्या अखेरीस ऋषभ पंतचा रस्ता अपघात झाला तेव्हा टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाजाची कमतरता जाणवू लागली. त्यावेळी केएल राहुल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला. यानंतर ही जबाबदारी केएस भरतने सांभाळली. यानंतर दरम्यानच्या काळात इशान किशनला ही जबाबदारी देण्यात आली; परंतु याचा भारतीय संघाला फारसा फायदा झाला नाही. केएस भरतने यष्टिरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली; पण तो फलंदाजीमध्ये ताे प्रभाव दाखवू शकला नाही. (Dhruv Jurel)

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते; परंतु तो दाेन्‍ही सामन्‍यात फलंदाजीत अपयशी ठरला. यामुळे मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्यापासून ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली. जुरेलने कसोटी सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि विकेटच्या मागे त्याने दाखवलेला वेग पाहता त्याची महेंद्रसिंग धोनीशी तुलना होऊ लागली.

रांची कसोटीत टीम इंडियाच्या पाच विकेट्सने विजय मिळवल्याबद्दल ज्युरेलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. यानंतर भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी आणखी एक 'एमएस धोनी इन द मेकिंग…' असे म्हटले होते, तर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनीही जुरेलचे कौतुक केले आहे.

जुरेलचे कौतुक करताना ते म्हणाले, ऋषभ पंत कधी पुनरागमन करेल हे आम्हाला माहित नाही. तो लवकरच होईल, पण आपण ज्युरेलबद्दल बोललो तर त्याच्याकडे खेळाडू म्हणून सर्व क्षमता आहे. तो पुढचा खेळाडू एमएस धोनी बनू शकतो. एमएस धोनी त्याच्या कारकिर्दीत जिथे पोहोचला होता तिथे ज्युरेल पोहोचू शकतो. सामन्यात ज्युरेलने केवळ बचावातच आपला खेळी केली नाही तर त्याने आक्रमक खेळी करून आपले फलंदाजीतील कौशल्य दाखवले आहे. (Dhruv Jurel)

'जिओ सिनेमा'शी बोलताना कुंबळे म्हणाले, सामन्यात जुरेल जेव्हा वेगवान गोलंदाजांविरूद्ध यष्टीरक्षण करत होता. तेव्हा त्याने जबरदस्त वेग दाखवला. फिरकीपटूंच्या चेंडूंवरही त्याने अप्रतिम झेलही घेतले. हा त्याचा दुसरा कसोटी सामना होता. मला खात्री आहे की, तो अधिकाधिक कसोटी सामने खेळत गेल्‍यास तो आणखी चांगला होईल. जुरेलने दोन कसोटी सामन्यांमध्ये 87.5 च्या सरासरीने आणि 53.02 च्या स्ट्राईक रेटने एकूण 175 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news