पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या गुडघ्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की शस्त्रक्रिया शुक्रवारी (दि.७) झाली असून तो आता वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या कारचा शुक्रवारी (दि. ३०) पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) संचालक श्याम शर्मा यांनी स्पष्ट केले होते की, "कारला अपघात हा ऋषभ पंतला झोप लागल्यामुळे झाला नाही. तर रस्त्यावर असणारा खड्डा चुकवत असताना ऋषभ पंतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला."
माहितीनुसार शुक्रवारी (दि.७) त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आता तो डॉ दिनशॉ परडीवाला, सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख आणि हॉस्पिटलमधील आर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर सर्व्हिसचे संचालक यांच्या थेट देखरेखीखाली असेल.
हेही वाचा