David Warner : डेव्हिड वॉर्नरचे कसोटी करिअर धोक्यात? या पुर्वीच घ्यायला हवी होती निवृत्ती : रिकी पाँटींग

David Warner : डेव्हिड वॉर्नरचे कसोटी करिअर धोक्यात? या पुर्वीच घ्यायला हवी होती निवृत्ती : रिकी पाँटींग
Published on
Updated on

मेलबर्न; पुढारी ऑनलाईन : भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोपर फ्रॅक्चर झाल्यामुळे मालिका अर्धवट सोडून त्याला मायदेशी परतावे लागले. मायदेशी परतण्यापूर्वी त्याने तीन डावात केवळ १, १० आणि १५ अशा धावा केल्या. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या वॉर्नरवर अॅशेस मालिकेतून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) व्यक्त केली आहे. दीर्घकाळ फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर त्याच्या कसोटी कारकिर्दीचा दुःखद अंत होऊ शकतो असेही पाँटींग यावेळी म्हणाला.

डेव्हिड वॉर्नरची कसोटी कारकीर्द धोक्यात (David Warner)

पाँटिंगला वाटते की ३६ वर्षांच्या डेव्हिड वॉर्नर इंग्लंड दौऱ्यावरील अॅशेस मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावे लागेल. त्यामुळे त्याला त्याच्या अटींवर कसोटी कारकीर्दीला अलविदा करता येणार नाही. या डावखुऱ्या फलंदाजाने २०१९ मधील इंग्लंड दौऱ्यावर फक्त ९.५ च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

रिकी पाँटिंगने 'आरएसएन क्रिकेट'शी बोलताना सांगितले की, यंदाच्या कसोटी चॅम्पियनशीपनंतर कसोटी क्रिकेटचे चक्र पुर्ण होईल आणि चॅम्पियनशीप फायनल अगदी ॲशसच्या १ आठवड्या आधी खेळवली जाणार आहे. तो पर्यंत ऑस्ट्रलिया संघ वॉर्नरला आपल्या सोबत ठेऊ शकतो. (David Warner)

तुम्ही धावा केल्या नाहीत तर तुम्ही अडचणीत येता

यावेळी पाँटींग म्हणाला, 'जर एक फलंदाज म्हणून तुम्ही धावा करत नसाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. असे सर्वांसबोत घडते. माझ्या सोबतसुद्धा असे घडले आहे. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वयात पोहचता आणि तुमचा फॉर्म घसरतो तेव्हा टीकाकार तुमच्यावर तुटून पडतात.

पाँटींगला वाटते की, जेव्हा दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना 'बॉक्सिंग डे' च्या सामन्यात वॉर्नर ने २०० धावा केल्या तेव्हा त्याने क्रिकेट मधून निवृत्ती घ्यायला हवी होती. कारण, तो त्याचा १०० वा सामना होता किंवा त्यानंतर त्या पुढील सामना सिडनी या त्याच्या घरच्या मैदानात खेळवला गेला होता. तेव्हा तरी त्याने निवृत्तीची घोषणा करायला हवी होती.

डेव्हिड वॉर्नरने आता पर्यंत १०३ कसोटी सामने खेळत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने ४५.५७ च्या सरासरीने ८१५८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २५ शतक आणि ३४ अर्धशतके झळकावली आहे. ३३५ ही त्याची सर्वोत्तम धावासंख्या राहिली आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news