Richest people in the world | एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी इतक्या स्थानावर

Block Feature
Block Feature
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ एलन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारतात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली आहे. फोर्ब्सने २०२३ मधील पहिल्या सहामाहीतील जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर (Richest people in the world)  केली आहे.

'फोर्ब्स' ने जाहीर केलेल्या 2023 च्या पहिल्या सहामाहीत जगातील 500 श्रीमंत लोकांनी त्यांच्या संपत्तीत ८५२ अब्ज डॉलरची भर घातली आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क २३४.७ अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. ते इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला आणि स्पेस एक्सप्लोरेशन कंपनी स्पेसएक्ससह, ट्विटचे सीईओ आहेत. यामध्ये टेस्लाचा २३ टक्के हिस्सा आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये टेस्लाचा दोन तृतीयांश सहभाग असल्याचेदेखील 'फोर्ब्स' ने (Richest people in the world) म्हटले आहे.

जगभरातील पहिल्या दहा अब्जाधिशांच्या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट आणि कुटुंब हे २२८.८ अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स हे ११९.३ अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. 'मेटा' चे कंपनीचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग हे १०१.८ अब्ज डॉलर संपत्तीसह जगभरातील उद्योगपतीच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. जगभरातील उद्योगपतींच्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये मात्र एकाही भारतीय उद्योगपतीचा समावेश नाही, असे 'फोर्ब्स' ने स्पष्ट केले आहे.

Richest people in the world : भारतातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी

भारताच्या अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. फोर्ब्सच्या 2023 च्या पहिल्या सहामाहीतील जागतिक अब्जाधीशांच्या यादीत १६९ भारतीयांनी स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी या यादीत भारतीय अब्जाधीशांची हीच संख्या १६६ होती. 'फोर्ब्स' ने सहा महिन्याच्या जाहीर केलेल्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत अव्वलस्थानी आहेत. त्यांची सध्याची संपत्ती ९३.५ अब्ज डॉलर इतकी आहे. तर दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी (एकूण संपत्ती-५१.४ अब्ज डॉलर) आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news