ब्रिटन की दुल्हनिया इंडियन दुल्हा ले जाएंगे ! महिला राजनैतिक अधिकारी झाली भारताची ‘सून’

ब्रिटन की दुल्हनिया इंडियन दुल्हा ले जाएंगे ! महिला राजनैतिक अधिकारी झाली भारताची ‘सून’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील ब्रिटनच्या राजनैतिक अधिकारकी डेप्युटी ट्रेड कमिशनर (Deputy Trade Commissioner) रिआनन हॅरिस यांनी (Rhiannon Harries) आपल्या ट्विटर अकाउंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की,  मी कधी विचारही केला नव्हता की, "मला भारतात माझ्या जीवनातील प्रेम मिळेल आणि मी लग्न करेन"

डेप्युटी ट्रेड कमिशनर असलेल्या रिआनन हॅरिस यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार भारतात मिळाला. त्यांनी एका भारतीय युवकाशी लग्न केलं आहे. रिआनन यांनी आनंदाची बातमी आपल्या लग्नाचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत सांगितले. या ट्टिटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी चार वर्षापूर्वी भारतात आले तेव्हा मला खुप आशा आणि स्वप्ने होती पण, मी कधी विचारही केला नव्हता की,  मला भारतात माझ्या जीवनातील प्रेम मिळेल आणि मी लग्न करेन. आता भारत माझ घर झालं आहे. तिने या ट्विटमध्ये  #IncredibleIndia बरोबरचं त्यांनी #shaadi #livingbridge #pariwar हॅशटॅग वापरले आहेत.

रिआनन यांच्या या ट्विटवर युझर्सनी भरभरून शुभेच्छा दिल्या. काही युझर्सनी त्यांच्या पतीबाबतीत विचारले आहे, पण याबद्दल कोणतीही माहिती त्यांनी या ट्टिटमध्ये सांगितलेली नाही. डेप्युटी ट्रेड कमिशनर एंड्र्यू फ्लोमिंग यांनी विवाहाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, माझ्या मैत्रिणीला नविन सुरूवातीस शुभेच्छा.

त्यांनी आपल्या जोडीदाराला टॅग करत दुसरे एक ट्टिट केले आहे की, मी आणि हिमांशु (Himanshu Pandey) सर्वांची आभारी आहोत, भारतातून आणि भारताबाहेरून आलेल्या शुभेच्छांनी मी आणि हिमांशू भारावून गेलो आहे. #IncredibleIndia मध्ये माझे आणखी स्वागत केल्याबद्दल धन्यवाद.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news