Male pill | संशोधकांनी विकसित केली ‘पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक गोळी’, तोंडावाटे घेता येणार

Male pill | संशोधकांनी विकसित केली ‘पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक गोळी’, तोंडावाटे घेता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गर्भधारणा टाळण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. पण आता संशोधकांनी पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक गोळी (Male pill) विकसित केली आहे. तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या या गोळीमध्ये शुक्राणूंना त्याच्या मार्गात प्रतिबंध करण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या गोळीविषयी माहिती समोर आली आहे. जिने प्रीक्लिनिकल मॉडेल्समध्‍ये तिची ताकद सिद्ध केली आणि तिने शुक्राणूंना त्यांच्या मार्गात यशस्‍वीपणे थांबवले आहे.

आपल्यापैकी बर्‍याच जणांना ही मोठी गोष्ट वाटत नसली तरी, हे खरे आहे. पुरुषांसाठी संततीप्रतिबंधक गोळी शक्य आहे हे सिद्ध करण्यासाठी हा अभ्यास दीर्घकाळ चालणारा आहे. हा शोध गर्भनिरोधकांसाठी गेम-चेंजर म्हणून ओळखला जातो. या विकसित केलेल्या गोळीचा शोध अभ्यास बुधवारी (दि. १४ फेब्रुवारी) जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

वेल कॉर्नेल मेडिसीनवर प्रकाशित झालेल्या एका अहवालात, या अभ्यासाचे सह-वरिष्ठ लेखक डॉ. जोचेन बक आणि डॉ. लोनी लेविन म्हणतात की हा शोध एक गेम चेंजर आहे. हे दोघेही वेल कॉर्नेल मेडिसीन इन्स्टिट्यूटमध्ये फार्माकोलॉजीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी म्हटले आहे की सध्या पुरुष केवळ नसबंदी आणि कंडोमचा संततीप्रतिबंधक म्हणून वापर करतात. ही पद्धत सुमारे २ हजार वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. गेल्या काही काळात पुरुषांच्या संततीप्रतिबंधकांवर संशोधन झाले असले तरी ते अद्याप संपलेले नाही.

त्याच्या मते, "पुरुष गर्भधारणेशी संबंधित कोणतीही जोखीम घेत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. यामुळे संभाव्य संततीप्रतिबंधक दुष्परिणामांबाबत पुरुषांची सहनशीलता कमी असते असे गृहीत धरले जाते."

या शोधाचा पुढील टप्पा म्हणजे प्रीक्लिनिकल चाचणी होय. जी मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी महत्वाच्या ठरू शकतात. तसेच पुरुष आता फार्मसीमध्ये जाऊन पुरुष संततीप्रतिबंधक गोळीविषयी (male pill) विचारु शकतात, अशी आशा डॉ. लोनी लेविन यांनी व्यक्त केली आहे.

या औषधाची प्रयोगशाळेतील उंदरांवर चाचणी केली असता अडीच तासांत शुक्राणू निष्क्रिय करण्याची क्षमता दिसून आली. त्याचे परिणाम स्त्रीच्या प्रजनन मार्गावरही दिसून आले. तीन तासांच्या कालावधीनंतर, काही शुक्राणूंची हालचाल पुन्हा सुरु झाली; आणि २४ तासांनंतर जवळजवळ सर्व शुक्राणूंची हालचाल सामान्यपणे दिसून आली."

या प्रयोगात उंदरांच्या शरीर संबंधावर अजिबात परिणाम झाला नाही. ही निरीक्षणे ५२ विविध शरीर संबंधांच्या प्रयत्नांवर आधारित आहेत. आणखी एक गट ज्यांना निष्क्रिय नियंत्रण पदार्थाचा डोस देण्यात आला होता त्यांनी त्यांच्या जोडीदाराला सुमारे एक तृतीयांशवेळा शरीर संबंधांत गुंतवून ठेवले.

संततीप्रतिबंधक गोळी ३० ते ६० मिनिटांच्या आत काम करणार

या दोन संशोधकांसमवेत काम केलेल्या पोस्टडॉक्टरल असोसिएट डॉ. मेलानी बालबॅच यांच्या मते, संततीप्रतिबंधक गोळी ३० ते ६० मिनिटांच्या आत कार्य करण्यास सुरवात करते. त्यांनी असाही दावा केला की प्रत्येक प्रायोगिक हार्मोनल अथवा नॉन-हार्मोनल पुरुष संततीप्रतिबंधकांना शुक्राणूंची संख्या कमी करण्यासाठी अथवा अंडाशय फलित करण्यास असमर्थ ठरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागतो. पण पुरुष संततीप्रतिबंधक गोळी काही तासांच्या आत आपले काम करते. इतर औषधांना काही आठवड्यांचा कालावधी लागतो. (Male pill)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news