G20 Summit : परस्परांतील अविश्वास दूर करा- PM मोदी

G20 Summit : परस्परांतील अविश्वास दूर करा- PM मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा – G20 Summit : जगभराचे लक्ष लागून असलेल्या जी२० शिखर परिषदेस आज औपचारिकरित्या प्रारंभ झालाजागतिक नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेचे उद्घाटन करताना, " जगभरात सध्या परस्पर विश्वासाचा असलेला अभावया वैश्विक समस्येवर बोट ठेवलेही वेळ जगाला नवी दिशा दाखविणारी असल्याचे सांगताना मोदींनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहनही केलेयावेळी पंतप्रधानांनी यजमानपदाचा उल्लेख करताना इंडिया ऐवजी भारत या नावाचा आवर्जून केलेला वापरउल्लेखनीय ठरला.

G20 Summit : वन अर्थ (एक पृथ्वी), वन फॅमिली (एक कुटुंबआणि वन फ्यूचर (एक भविष्य)

जागतिक नेत्यांचा समावेश असलेली जी२० शिखर परिषदसंमलेन स्थळ असलेल्या भारत मंडपममध्ये आज सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालीप्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणार्कच्या प्राचीन सूर्यमंदिरातील कालचक्राच्या प्रतिकृतीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केलेया परिषदेमध्ये वन अर्थ (एक पृथ्वी), वन फॅमिली (एक कुटुंबआणि वन फ्यूचर (एक भविष्यया तीन सत्रांमध्ये सर्व वैश्विक नेते सहभागी होणार आहेतया परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० चे अध्यक्ष या नात्याने भारतातर्फे संपूर्ण जगाला परस्पर विश्वास वाढविण्याचे आवाहन केलेतत्पूर्वीपहिल्या सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांना जी२० चे स्थायी सदस्य म्हणून आपले स्थान घेण्याचे निमंत्रण दिले.

G20 Summit : 'सबका साथसबका विकाससबका विश्वाससबका प्रयास'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की२१ व्या शतकातील ही वेळ जगाला नवी दिशा दाखवण्याची वेळ आहेवर्षानुवर्षे जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेतआपल्याला मानवतावादी दृष्टीकोनातून या समस्या सोडवायला हव्यातआपण एकत्रितपणे या समस्या सोडवू शकतो असा आपल्याला विश्वास आहेअसेही मोदी म्हणालेकोविड महामारीच्या काळानंतर संपूर्ण जगात परस्पर विश्वासाचा अभाव असल्याचे दिसतेयुद्धामुळे हा अविश्वास आणखी वाढला आहेअशा काळात 'सबका साथसबका विकाससबका विश्वाससबका प्रयासही संकल्पना मानवकेंद्रित दृष्टिकोनासह संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकतेअसेही प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

जी२० परिषदेनिमित्त भारतात ६० हून अधिक शहरांमध्ये २०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन झाले असून परिषद एका अर्थाने भारतातील लोकांची जी२० बनल्याची टिप्पणी मोदींनी केलीतसेच जी२० च्या अध्यक्षपदावरून भारत संपूर्ण जगाला आवाहन करतो कीविश्वासाच्या अभावाचे रूपांतर एकमेकांवरील विश्वासात करावेयावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोरोक्कोमधील भूकंपात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केलीया कठीण काळात संपूर्ण जागतिक समुदाय मोरोक्कोसोबत आहेत्यांना शक्य ती सर्व मदत देण्यास तयार आहोतअशीही ग्वाही त्यांनी दिली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news