Redmi Note 11S : Redmi कडून जबरदस्त फिचर्स, कॅमेरा आणि आकर्षक डिस्प्लेचा मोबाईल आज होणार लॉन्च

Redmi Note 11S : Redmi कडून जबरदस्त फिचर्स, कॅमेरा आणि आकर्षक डिस्प्लेचा मोबाईल आज होणार लॉन्च
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Redmi Note 11S हा फोन आज भारतात लॉन्च केला जाणार आहे. दरम्यान, याबाबत Redmi कडून ट्विटरवर कंपनीच्या एक्झिक्युटिव्हने माहिती दिली आहे. Redmi Note 11 स्मार्टफोन गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर लॉन्च झाला होता.

Redmi Note 11S ची भारतात काय आहे किंमत

Redmi Note 11 फोनच्या बेस मॉडेलची किंमत १३,९९९ रुपये ते १४,४९९ रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात १६,९९९ ते १७,४९९ पर्यंत असू शकते. Redmi Note 11 च्या किमतींमध्ये बदल करण्यात आला आहे.

तर Redmi Note 11S च्या किमतीची माहिती यापुर्वीच समोर आली आहे. भारतात याची किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरू होईल, यामध्ये ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज असेल. फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजची किंमत १९,९९९ रुपये असू शकते.

रेडमीने या प्रॉडक्टचे रजिस्ट्रेशन अथवा खरेदीसाठी नोटिफाय मी लिंक दिली आहे. त्यासाठी या इव्हेंटचे अपडेट पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगवर क्लिक करा. नोटिफाय केल्यानंतर स्मार्टफोन आणि आकर्षक कुपन्स जिंकण्याची संधी आहे.

काय आहेत फिचर्स

हा मोबाईल ड्युअल सीम असणार आहे. या फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल-एचडी + AMOLED डॉट डिस्प्ले आहे, ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट आहे. याशिवाय, हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक G96 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8 GB LPDDR4X रॅम उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 108-मेगापिक्सेल Samsung HM2 फ्रंट कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज 128 GB आहे. फोनची बॅटरी 5,000 mAh आहे, ज्यामध्ये 33W प्रो फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Redmi Note 11S Full Review: Making Budget Phones BETTER!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news